भाजपा आमदार सुरजित दत्ता यांचे निधन

28 Dec 2023 11:33:46
त्रिपुरा, 
Surjit Dutta passed away त्रिपुरातील भाजपा आमदार सुरजित दत्ता यांचे निधन झाले आहे. ते बरेच दिवस आजारी होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरजीत दत्ता यांचे बुधवारी रात्री कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. सुरजित दत्ता (70 वर्ष) यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. रामनगर मतदारसंघाचे आमदार सुरजित दत्ता यांना अनेक आजारांनी ग्रासले होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मंगळवारी रात्री आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Surjit Dutta passed away
त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोलकाता रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी भाजपा आमदाराच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. Surjit Dutta passed away सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सीएम साहा यांनी लिहिले की, 'ज्येष्ठ राजकारणी आणि विद्यमान भाजपा आमदार सुरजित दत्ता यांच्या निधनाच्या बातमीने दुःख झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
Powered By Sangraha 9.0