सिंधू सन्मान पुरस्कार डॉ. माधवी ठाकरे यांना जाहीर

28 Dec 2023 20:42:11
नागपूर, 
Dr. Madhavi Thackeray : संघमित्रा सेवा प्रतिष्ठानचा सिंधू सन्मान पुरस्कार यंदा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ. माधवी ठाकरे यांना जाहीर झाला आहे. धंतोलीमधील देवी अहल्या मंदिरात शनिवारी 30 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आयोजित कार्यक‘मात तो प्रदान केला जाईल. ‘नीरी’चे संचालक डॉ. अतुल वैद्य अध्यक्षस्थानी राहतील. Dr. Madhavi Thackeray राष्ट्रसेविका समितीच्या प्रथम प्रचारिका सिंधुताई फाटक यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार वेगळी वाट चोखाळणार्‍या महिलांना देण्यात येतो. सर्व नागरिक बंधू- भगिनींनी कार्यक‘मास उपस्थित राहण्याचे आवाहन संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रिया काळे यांनी केले आहे.

Dr. Madhavi Thackeray 
 
 
Powered By Sangraha 9.0