अगरतळा,
Tripura त्रिपुराचे भाजपाचे आमदार सुरजित दत्ता यांचे बुधवारी रात्री प्रदीर्घ आजारामुळे कोलकाता रुग्णालयात निधन झाले. Tripura ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या दत्ता यांना मंगळवारी श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे Tripura अगरतळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी कोलकाता येथे हलवण्यात आले, मात्र उपचारारम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी समाजमाध्यमातून शोक व्यक्त केला. ज्येष्ठ राजकारणी व भाजपाचे रामनगरचे विद्यमान आमदार सुरजित दत्ता यांचे राज्याबाहेरील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याने मला दु:ख झाले आहे. त्यांचे निधन हे राज्यासाठी कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. शोकाकुल कुटुंबाप्रति माझ्या संवेदना आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्री साहा यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या सन्मानार्थ Tripura त्रिपुरा सरकारने गुरुवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला. दत्ता यांनी १९८८ मध्ये पहिल्यांदा रामनगर विधानसभेची निवडणूक लढवली व जिंकली. ते सुधीर रंजन मजुमदार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-टीयूजेएस सरकारमध्ये मंत्री झाले होते.