नागपूर,
Condolences पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या ज्येष्ठ भगिनी, बिडी कामगारांचे नेते दिवंगत कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धांगिनी व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या शिल्पकार माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या मातोश्री बौद्ध उपासिका, नलिनी कुंभारे यांचे खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर कन्हान नदी मोक्षधाम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांनी केलेली समाजसेवा चिरकाळ समरणीय राहणारी आहे.