मुंबई,
Virender Sehwag son क्रिकेटच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे दोन भाऊ एकमेकांसोबत खेळले आहेत. पिता-पुत्र दोघांमध्ये क्रिकेट खेळणे आता सामान्य झाले आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही आयपीएलमध्ये पदार्पण करताना दिसला. दरम्यान, आता या यादीत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नाव जोडले गेले आहे, ज्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये एकट्याने भारताला विजय मिळवून दिला.

जुन्या फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये सेहवागची गणना केली जाते. आता त्यांचा मुलगा आर्यवीर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. Virender Sehwag son नुकताच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सेहवागचा मुलगा आर्यवीर मॅचची सुरुवात त्याच्याच स्टाइलमध्ये करताना दिसत आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी क्रीझवर यायचा तेव्हा त्याला पाहून गोलंदाजांना घाम फुटायचा. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आर्यवीर 16 वर्षाखालील विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी आला होता. त्याने वीरेंद्र सेहवागच्या शैलीत चौकार मारून डावाची सुरुवात केली. या सामन्यात तो 45 चेंडूंचा सामना करत केवळ 25 धावा करू शकला. अशाप्रकारे त्याने छोटी खेळी खेळूनही आपल्या ताकदीची झलक जगाला दाखवून दिली.