साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries): सांपत्तिक वाद मिटतील
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेल्या ग्रहयोगांच्या प्रभावाने कुटुंबातून काही चांगल्या वार्ता कानी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः काही कुटुंबात मुला-मुलींच्या लग्नकार्याबाबत काही ठोस पावले उचलली जातील. या काळातच काहींना घर, फ्लॅट तर काहींना एखादे वाहन खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. स्वतःच्या वास्तूत राहावयास जाण्याचे योग काही मंडळींना लाभू शकतात. काहींचे सांपत्तिक वाद, सरकारी कामे पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. युवकांना स्पर्धा परीक्षांमध्ये सरशी साधता येईल.
शुभ दिनांक - 3, 4, 5, 8.
वृषभ (Taurus): आरोग्य जपावयास हवे
या आठवड्यातील ग्रहमान आपणास संमिश्र स्वरूपाचे आहे. या संमिश्र ग्रहस्थितीचा परिणाम म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला आपली काही आर्थिक कामे यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकतील, तर सप्ताहाच्या मध्यानंतर काही मंडळींना आरोग्याच्या दृष्टीने त्रास सुरू होऊ शकतो. त्यामुळे त्यावेळी आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. घरातील वृद्ध मंडळींचे आरोग्य सांभाळावे लागेल. काही मंडळींना या सप्ताहात मोठे आर्थिक व्यवहार करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. आर्थिक सतर्कता महत्त्वाची आहे.
शुभ दिनांक - 3, 4, 6, 7.
मिथुन (Gemini): मनोबल उत्तम राहील
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहमान सुरुवातीस अनुकूल असले, तरी ते उत्तरार्धात मात्र संमिश्र स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपले मनोबल उत्तम राहील. आर्थिक बळ कायम असल्याने आत्मविश्वास दुणावेल. त्यामुळे छोट्या-मोठ्या समस्यांचा आपण सहज निपटारा करून यश पदरात पाडून घेऊ शकाल. दरम्यान, कुटुंबात किंवा मित्रपरिवारात काही वादविवादाचे किंवा अनपेक्षित प्रसंग निर्माण होऊ शकतात. वाटाघाटी, वारशाचे प्रश्न मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्याने सोडवावेत.
शुभ दिनांक - 4, 5, 6, 8.
कर्क (Cancer): कार्यक्षेत्रात उत्तम संधी
हा आठवडा आपणास काही अनुकूल घटनांनी युक्त व चांगले अनुभव देणारा असण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस काहींना स्थावर जंगम, घर, फ्लॅट किंवा वाहन यांच्या खरेदीस अनुकूल ठरू शकतो. काही मंडळींना नोकरी-व्यवसायासह काही अन्य क्षेत्रातही उपयुक्त संधी प्राप्त होऊ शकेल. काहींना नोकरीसाठी उत्तम योग लाभू शकतात. व्यवसायात विस्ताराच्या संधी लाभून आर्थिक यश प्राप्त होऊ शकेल. आर्थिक उलाढालही वाढू शकेल. द्रव पदार्थांच्या व्यापारात चांगल्या संधी लाभू शकतील. अडलेल्या पैशाची तसेच येणे असलेल्या पैशाची वसुली होऊ शकेल.
शुभ दिनांक - 3, 7, 8, 9.
सिंह (Leo): कामात वेगवान प्रगती
Weekly Horoscope : या आठवड्यात आपणास कार्यक्षेत्राच्या संबंधात बव्हंशी अनुकूल ग्रहस्थिती लाभली आहे. काही जणांना तर प्रबळ आर्थिक शुभयोग लाभण्याची शक्यता आहे. या योगांच्या प्रभावामुळे नोकरी-व्यवसायातील लाभासाठी हे ग्रहमान अतिशय अनुकूल आहेत. विशेषतः सरकारी नोकरीत, लष्करात असलेल्या मंडळींना या सप्ताहातील ग्रहयोगाचा विशेष अनुभव येऊ शकेल. कार्यक्षेत्रात उपयुक्त बदल केल्यास आणखी प्रभावीपणे लाभ पदरी पाडून घेता येतील. काहींना वारसा हक्क, भाऊबंदकीतून संपत्ती लाभू शकेल. प्रलंबित कामांना वेग लाभेल.
शुभ दिनांक - 2, 3, 6, 7.
कन्या (Virgo): महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार
या आठवड्यातील ग्रहमान आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्वरूपाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे राहील असे दिसते. नोकरी-व्यवसायात व्यवस्थित नियोजन करून वाटचाल केल्यास अपेक्षित यश पदरी पाडून घेता येऊ शकेल. काहींना नवी नोकरी लागणे, नोकरीत बदल करणे, व्यवसाय विस्तार याबाबत विचार करता येऊ शकेल. युवा वर्गास नोकरी मिळवता येईल. कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरेतून अशा संधी मिळू शकतील. व्यवसायात नवनवीन संकल्पना आणि तंत्राचा वापर करणे लाभदायक ठरू शकेल. यामुळे आपली कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिनांक - 3, 4, 5, 6.
तूळ (Libra): कार्याची दखल घेतली जाणार
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास सुखकर ठरावा. त्यातही सप्ताहाचा मध्य विशेष उत्तम राहील. राजकारण व समाजकारणाशी जुळलेल्या व्यक्तींना उत्तरार्ध काहीसा तापदायक ठरू शकतो. आपल्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल. आपणास दुर्लक्षित असल्याचे जे वाटत होते, त्या स्थितीत बदल घडून येईल. नोकरी-व्यवसायात महत्त्व वाढताना दिसेल. अधिकारी वर्गाची मर्जी राहील तसेच कार्यपूर्ततेत सहकार्यांची उत्तम मदत होऊ शकेल. व्यवसायाचा विस्तार करता येईल.
शुभ दिनांक - 4, 5, 6, 7.
वृश्चिक (Scorpio): अनपेक्षित लाभ संभवतो
या आठवड्यात आपण काही महत्त्वाचे शुभ योग अनुभवणार आहात, असे प्राप्त ग्रहमानावरून म्हणता येईल. आपल्या राशिस्वामी मंगळाच्या प्रभावामुळे काही घटनाक्रमांना अचानक किंवा आश्चर्यकारक परिणाम देण्याचे बळ मिळण्याची शक्यता आहे. काही लाभ अनपेक्षितपणे फलद्रूप होऊन आनंद देऊ शकतात. हा काळ आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविणारा राहील. अखंड कार्यरत राहून कार्यसिद्धीस नेण्याच्या आपल्या स्वभावाला दाद मिळेल. आपल्या योजनांमध्ये कुटुंबीय व मित्रवर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. आपल्या योजनांची अगोदरच वाच्यता करण्याचे टाळायला पाहिजे.
शुभ दिनांक - 3, 5, 6, 7.
धनु (Sagittarius): समाधानाचे वातावरण राहील
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहस्थिती आपणास सुखवर्धक ठरणार आहे. या सप्ताहातील ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी कार्यक्षेत्रात प्रगतीचे सूचक आहे. अर्थलाभास अनुकूल असे व्यावसायिक योग मिळू शकणार आहेत. आपल्या प्रयत्नांना यश आणि आनंदोत्सवाची जोड मिळू शकेल. यामुळे कुटुंबात, व्यवसायात, आपल्या कार्यक्षेत्रात, मित्रवर्गात आनंद व समाधानाचे वातावरण राहील. नोकरी- व्यवसायात प्रगतिकारक योग लाभावेत. जबाबदारीही वाढेल, आर्थिक लाभ देखील होईल. नोकरीच्या शोधात असणार्यांना यश मिळू शकेल. युवा वर्गास चांगल्या संधी मिळतील.
शुभ दिनांक - 5, 6, 7, 8.
मकर (Capricorn): योजनाबद्ध आगेकूच करा
अनुकूल ग्रहस्थितीमुळे आपली कामे वेगाने पूर्णत्वास जाऊ शकणार असल्याने योजनाबद्ध आगेकूच करावयास हवी. यात आपले कुटुंबीय, मित्रमंडळ, सहकारी यांचे सहकार्य मिळेल. अधिकारी, ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आपल्या कामांना अधिक वेगाने व उत्तमरीत्या पूर्ण करून त्याची पुरेपूर फले प्राप्त करून घेऊ शकाल. या संधीचा लाभ घेऊन काही प्रलंबित कामे वा योजनांना मूर्त रूप देण्याचा विचार करू शकता. विशेषत: विद्यार्थी व तरुण मंडळींची विद्यार्जनाची तृष्णा पूर्ण करण्यासही मदत लाभू शकेल.
शुभ दिनांक - 3, 4, 5, 6.
कुंभ (Aquarius): आर्थिक अडचणी संभवतात
Weekly Horoscope : हा आठवडा काही महत्त्वपूर्ण घडामोडींनी युक्त राहण्याची शक्यता आहे. काही व्यापारी मंडळींना मोठ्या व्यावसायिक संधी लाभाव्यात. किमान त्यासंबंधाने केलेल्या आपल्या प्रयत्नांना यश मिळू शकेल. उत्तरार्धात मात्र काहींना आरोग्यविषयक चिंता निर्माण करणारे योग असल्याने त्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. काहींना स्वभावात निर्माण होणारा उग्रपणा प्रगतीत बाधा उत्पन्न करणारा ठरू शकतो. त्यामुळे अनुकूल बदल करणे हितावह राहील. कुटुंबात, परिवारात तसेच कार्यस्थळी सौहार्द्रपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभ दिनांक - 5, 6, 7, 8.
मीन (Pisces) : अनुकूल संधी लाभणार
Weekly Horoscope : या सप्ताहाच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास अतिशय अनुकूल ठरणार आहे. हे ग्रहमान आपणास सर्व क्षेत्रात उपयुक्त परिस्थिती निर्माण करू शकतील. व्यवसाय विस्तार करण्यासाठी अनुकूल संधी येईल. काहींना अधिक पगाराची नोकरी लाभू शकेल. मात्र असे असले तरी काहींना सप्ताहाच्या उत्तरार्धात आर्थिक घडामोडी व कुटुंबातील काही वादांच्या संदर्भात काळजी घेणे आवश्यक राहील. काही मंडळींना त्यांचे शौक आणि व्यसनांवर ताबा ठेवणे अत्यावश्यक आहे. युवावर्गास तडकाफडकी काही सुयोग लाभू शकतात. होणारा आर्थिक लाभ अनपयुक्त दिशेस खर्ची पडण्याचा धोकाही आहे.
शुभ दिनांक - 2, 3, 6, 7.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746