वेध
- संजय रामगिरवार
dubai-cop28-coal दुबई येथे ३० नोव्हेंबरपासून ‘कॉप-२८' संमेलन सुरू झाले आहे. हे आयोजन १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पर्यावरणाशी संबंधित अशा कुठल्याही संमेलनाच्या आयोजनादरम्यान पर्यावरण संरक्षणाची चर्चा अगदी जोरात असते. मोठमोठी आश्वासने आणि आव्हाने पेलण्याची कटिबद्धता आंतरराष्ट्रीय नेत्यांकडून व्यक्त केली जाते. dubai-cop28-coal त्यांच्या वक्तव्यावरून असे वाटते की, प्रदूषणाची जागतिक समस्या अगदी आजच नष्ट होणार आहे. अशीच चर्चा ‘कॉप-२८' याही संमेलनात सुरू आहे. त्याचे कवित्व काही दिवस चालेल आणि नंतर पर्यावरणातच विरून जाईल. पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि शाश्वत विकास यावर सध्या जोरात चर्चा आहे. आपल्या देशातही ती आहे. dubai-cop28-coal कारण सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यात प्रदूषणात वाढ झालेली असते. तेव्हा पर्यायाने कोळशाचा वापर कमीत कमी कसा करता येईल, यावरही चर्चा रंगते. कुठलीही चर्चा करणे केव्हाही सोपे असते. पण त्याची अंमलबजावणी करणे कठीण जाते आणि त्यामुळेच आजवरच्या अनेक संमेलनांनंतरही पर्यावरणाची स्थिती अधिक बिकट होत चालली आहे.dubai-cop28-coal

२०२२ मध्ये वैश्विक कोळसा उत्पादनात तब्बल ८.२ टक्क्यांनी वाढ झाली, हे त्याचेच द्योतक आहे. आशियाई देशात तर कोळशाचा वापर तुलनात्मकदृष्ट्या वाढत आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे. कोळशाचा शोध लागला तेव्हा तो केवळ अन्न शिजवण्यासाठी तेवढा वापरला जात होता. dubai-cop28-coal पण वाफेवरचे इंजिन रुळावर धावू लागताच जागतिक विकासाचे इंजिनही वेगाने पळू लागले. १८ व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली आणि कोळसा आधुनिक विकासाचा महत्त्वाचा घटक ठरला. २१ व्या शतकात तर विद्युत निर्मितीसाठी कोळसा प्रमुख संसाधनाच्या रूपात समोर आला आणि पुढे त्यात कमालीची वाढ झाली. भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात ऊर्जेची मागणी मोठी असते आणि कोळशाचा वापरही तेवढाच होतो. २०२२-२३ दरम्यान एकूण विजेच्या उत्पादनातील ७४.३० टक्के उत्पादन हे केवळ कोळशातून झाले.
dubai-cop28-coal अशा विकासासोबतच कोळसा पर्यावरणाच्या èहासाचे मोठे कारणही बनला. कोळसा जाळल्याने कार्बन डाय ऑक्साईडसोबतच अनेक ग्रीन हाऊस वायूंची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. वातावरणात एसओ२ आणि एनओएक्स पार्टिकल मॅटर आणि पाऱ्यासारख्या भारी धातूंची मिसळण झाली. जे मानवी जीवनासाठी घातक ठरत आहे. अमलीय वर्षा आणि एकूण पृथ्वीच्या तापमानात वाढ आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीतही झालेली वाढ अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. फ्लाय अॅशसारख्या वस्तूचे काय करावे हा गंभीर प्रश्न आहे आणि त्यामुळे जलस्रोतही दूषित होत आहेत. कोळसा काढल्याने जमीन मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. असे असताना कोळसा आपण हद्दपार का करू शकत नाही, हा प्रश्न समोर थाटतो. पण तो वाटते तेवढा सोपा नक्कीच नाही.
कारण ऊर्जा उत्पादनासाठी कोळशापेक्षा सोपे आणि स्वस्त संसाधन सध्या दुसरे नाही. dubai-cop28-coal कोळसा जवळपास जगाच्या सर्वच प्रदेशांमध्ये सहज उपलब्ध असून तो काढण्याचा खर्चही अन्य संसाधनांपेक्षा खूप कमी आहे. मोठा रोजगारही त्यामागे आहे. उलट, सीईएच्या अहवालानुसार, नवीन ऊर्जा स्रोत आजच्या विजेची गरज भागवूच शकत नाही. २०२३ मध्ये अपारंपरिक उर्जा स्रोतांतून केवळ २१२ गेगॅवॉटच वीज निर्मिती होऊ शकली. तर वित्त वर्ष २०३१-३३ पर्यंत मात्र ९२४ टेरावॉट तास विजेचे उत्पादन होऊ शकते; जे आवश्यकतेनुसार पर्याप्त नक्कीच नाही. dubai-cop28-coal भारतात सध्या कोळशातून ९६ टक्के विजेचे उत्पादन होत आहे; जे कमी करून अपारंपरिक ऊर्जेकडे वळवणे कठीण आहे, हे आकडेच सांगतात.
त्यामुळे लगेचच आपण कोळसा उत्पादन थांबवू शकत नाही. मात्र, ते निश्चितपणे कमी करावे लागणार आहे. कारण त्याशिवाय येत्या काळात अन्य कुठलाही पर्याय उरणार नाही. अपारंपरिक उर्जा स्रोतांमध्ये हळूहळू पण निरंतर वाढ करीत जावे लागणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास वाढणे आवश्यक आहे. dubai-cop28-coal नवनवीन ऊर्जा स्रोतांचा शोध लागणे आणि ते भारतासारख्या देशाला परवडेल, असा असणे आवश्यक आहे. हे कठीण वाटत असले तरी तसे करावेच लागले. अन्यथा, येत्या काळात अवघी मानवजात धोक्यात येऊ शकेल.
९८८१७१७८३२