वकाळीतून बचावलेल्या तूर पिकावर आता अळींचे आक्रमण

03 Dec 2023 17:29:39
मानोरा,
toor pik तालुक्यातील सोयाबीन व तूर पिकाकडे वळलेल्या शेतकर्‍यांची आस्मानी संकटे पाठ सोडीत नसून गत महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाचा प्रचंड फटका सोसून कसेबसे तग धरून असलेल्या तूर पिकांच्या रानावर आता बदलत्या वातावरणामुळे किडींचा व अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव होऊन तूर पिकाच्या उत्पादनावर याचे अरिष्ठ परिणाम होण्याची चिन्हे पुढे येत आहेत.
 

तूर डाळ  
 
तालुयातील खरीप मधील सोयाबिन हे मुख्य पीक असून, जुलै महिन्यामध्ये शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा आणि त्यानंतर पावसाच्या दीर्घ खंडाचा सामना करावा लागला. सोयाबीन पीक उत्पादनावर याचा विपरीत परिणाम तालुयात झालेला आहे. सोयाबीन पेरलेल्या बहुतांश शेत शिवारात शेतकरी आंतरपीक म्हणून तूर या पिकाला पसंती तालुयात देतो. नैसर्गिक अवकृपेने निम्म्यावर आलेल्या सोयाबीन पिकाची कसर तूर ह्या पिकात भरून निघण्याच्या आशा प्रचंड अवकाळी पावसाने धूसर केलेल्या असतानाच तूर लागवड केलेल्या प्रत्येक शेत शिवारात अवकाळी मुळे बदललेल्या वातावरणात मोठ्या संख्येने तुरीच्या शेंगांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे.toor pik सततच्या नैसर्गिक आपत्तीने भरडलेला तालुयातील शेतकरी तूर पिकाला वाचविण्यासाठी कसरत करीत असून शेतकर्‍यांच्या खर्चामध्ये आता अतिरिक्त फवारणीमुळे आणखी वाढ होणार असल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0