हरदडा येथे जुगार अड्ड्यावर धाड

30 Dec 2023 19:39:59
- रोख रकमेसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

उमरखेड, 
उमरखेड पोलिस ठाण्यांंतर्गत हरदडा ते ब्राम्हणगाव रोडवरील शेत शिवारात गोपेवाड यांच्या शेतात जुगार भरत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. Hardada gambling या जुगार अड्ड्यावर धाड मारून सात जुगार्‍यांना शुक्रवार, 29 डिसेंबरला दुपारी 4 च्या सुमारास ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील नगदी 34,840 रुपये व 3,95,840 रुपयांच्या सात मोटार सायकलींसह मुद्देमाल जप्त केला.
 
 
Jugar
 
Hardada gambling जुगार खेळताना अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बापूराव गोपेवाड ढाणकी, शेख लतीफ शेख हुसेन कृष्णापूर, लक्ष्मण कळमकर ढाणकी, नितीन कुसुंबाड ढाणकी, कयूमखान रियाजखान पठाण ढाणकी, विलास याटेवाड ढाणकी यांना अटक करून जातमुचलक्यावर सोडण्यात आले. पुढील तपास पोलिस सहनिरीक्षक भरत चापाईतकर व जमादार रोशन सरनाईक करत आहेत. अटक करण्यात आलेल्यांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 12 (अ) नुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस सहनिरीक्षक गजानन गजभारे, उपनिरीक्षक अमोल सांगळे, जमादार रमेश राठोड व कर्मचार्‍यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0