सडक अर्जुनी,
Mama-Bhacha Yatra : तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे नववर्षाचे शुभपर्वावर 1 जानेवारीपासून दोन दिवसीयमामा-भाचायात्रेला सुरुवात होत आहे. मामा-भाचा देवस्थान समिती व सरपंच उमराव कापगते यांच्या पुढाकाराने मागील 18 वर्षांपासून या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. गिरोलापासून अवघ्या 1 किमी. अंतरावर जंगलात टेंभरूण प्रजातीची दोन उंचचउंच झाडे आहेत. यातील मोठे झाड मामा आणि लहान झाड म्हणजे भाचाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. ही झाडे भाविकांची श्रध्दास्थान असून या देवस्थानाच्या विकासासाठी देवस्थान समिती व सरपंच उमराव कापगते तसेच परिसरातील ग्रामस्थांनी 18 वर्षापूर्वी यात्रेला सुरुवात केली.
यात्रा Mama-Bhacha Yatra नववर्षाच्या पहिल्या दिवशी भरत असल्याने हजारोंच्या संख्येने येणारे यात्रेकरू धार्मिक श्रध्देसह नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करतात. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षाने हे देवस्थान विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे नववर्षाचे पहिल्या दिवशी या यात्रेत सहभागी होणार्या भाविकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. यंदा 1 जानेवारी रोजी घटस्थापना व ज्योत प्रज्वलन करुन यात्रेची सुरुवात होणार असून 2 जानेवारीला दहीकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत प्रवचन, उत्सव व नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच धनंजय स्मृतीहरंगभूमी वडसा निर्मित गोरगरीब नाट्य मंडळाच्या वतीने ‘तुच माझी सौभाग्यवती’ आणि राजसा रंगभूमी वडसा निर्मित कला संस्कृती नाट्य मंडळाच्या वतीने ‘सुन सांभाळा पाटलीनबाई’ या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या Mama-Bhacha Yatra यात्रेच्या आयोजनासाठी सरपंच उमराव कापगते व देवस्थान समिती सदस्य शामराव कापगते, सेवकराम चांदेवार, आशिष संग्रामे, दामोधर बांगरे, आशिष दरवडे, प्रशांत कापगते, रामदास दरवडे, रमेश कापगते, हरिचंद वलथरे, राजाराम बांगरे, गुलाब पुसाम, हेमेंद्र तागडे, हेमराज कुंभरे, चंद्रशेखर लंजे, फुलीचंद कापगते, महेंद्र खैरे, विजय माने, मंगर वलथरे, दिगांबर तागडे, उमेश तागडे, सुनिल कापसे व गिरोलावासी परिश्रम घेत आहेत.