कामगार सुरक्षेला प्राधान्य : का आणि कसे ?

labour-safety-industry मशीन-माणूस उभयतांचे नुकसान

    दिनांक :04-Dec-2023
Total Views |
इतस्तत:
- दत्तात्रेय आंबुलकर
labour-safety-industry एकीकडे नुकतीच उत्तरकाशीतील बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका झाल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे मागील काही महिन्यांत देशाच्या कानाकोपऱ्यात घडलेले औद्योगिक क्षेत्रातील अपघातही तितकेच चिंताजनक ठरावे. labour-safety-industry त्यानिमित्ताने या अपघातांमागची कारणे आणि सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजना यांचा हा आढावा ! सुमारे एक महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील एका प्रक्रिया उद्योगात झालेला मोठा स्फोट व त्यानंतरच्या भीषण आगीत सात कामगारांच्या झालेल्या मृत्यूमुळे रायगड वा राज्य पातळीवरच नव्हे, तर सारेच उद्योग क्षेत्र पुरतेपणी हादरून गेले. labour-safety-industry या आणि अशा प्रकारांच्या दुर्दैवी अपघाती व जीवघेण्या घटनांनंतर औद्योगिक क्षेत्रातील कामकाज प्रक्रिया व कर्मचारी-कामगार सुरक्षेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. labour-safety-industry मात्र, त्याकडे कायमस्वरूपी गांभीर्याने पाहिले जाते का? प्रश्न मात्र त्याच्या प्रश्नचिन्हासह कायमच उरतो. वरील घटनेपूर्वी सुमारे पाच महिने आधी अंबरनाथ औद्योगिक परिसरात मोठा व दुर्दैवी औद्योगिक अपघात घडला होता. त्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीत होरपळल्याने सहा कामगार जखमी झाले, तर एका कंत्राटी कामगाराचा याच दुर्घटनेत मृत्यू झाला. labour-safety-industry ही तशी ताजी वस्तुस्थिती आहे.
 
 

labour-safety-industry 
 
 
औद्योगिक अपघातांच्या संदर्भात स्थळ-काळ कुठलेही असो अपघात, अपघातांची भीषणता व त्यांची धग मात्र कायम असते हेच खरे. औद्योगिक अपघातांच्या याच भीषण मालिकेत पुद्दुचेरी येथील औषध निर्माण करणाऱ्या कंपनीतील मोठ्या व भीषण अपघाताचा उल्लेख करणे, नव्या संदर्भात अपरिहार्य ठरते. labour-safety-industry त्या ठिकाणी आगीत होरपळून १४ कामगार मृत्युमुखी पडले, या आकडेवारीवरूनच अपघाताच्या दाहकतेची कल्पना सहजपणे येते. संख्येच्या आधारे सांगायचे झाल्यास, यावर्षीच्या १० महिन्यांमध्ये कारखान्यांमध्ये मोठ्या व गंभीर स्वरूपातील आगीच्या सुमारे १२ घटना जाहीर करण्यात आल्या आहेत. ही संख्या अर्थातच नोंद झालेल्या मोठ्या आणि भीषण स्वरूपातील आगीच्या घटनांची आहे. labour-safety-industry यातून औद्योगिक क्षेत्रातील आगीच्या मोठ्या अपघातांची संख्या व त्यांची भीषणता स्पष्ट होते. वरील प्रकारच्या गंभीर व जीवघेण्या अपघातांचा तपशील आणि त्यांची भीषणता यांचे तपशीलवार विश्लेषण-विवेचन करणे अर्थातच आवश्यक ठरते.
 
 
labour-safety-industry या संदर्भात मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या व देशपातळीवर सुमारे दोन हजारांच्यावर कंपन्यांना औद्योगिक व कामगार सुरक्षा या महत्त्वाच्या विषयात सल्ला-सेवा देणाऱ्या  अपरिजिता समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नागराज कृष्णन् यांनी त्यांचा अभ्यास व अनुभव या आधारावर नमूद केल्यानुसार आज कामगार-कर्मचाऱ्यांपासून छोट्या-मोठ्या कारखानदारांपर्यंत औद्योगिक व कामगार सुरक्षेच्या संदर्भात प्रमुख व अत्यंत महत्त्वाच्या अशा औद्योगिकदृष्ट्या पर्यावरण रक्षण, आरोग्य व्यवस्थापन व मुख्य म्हणजे कर्मचारी-कंपनी यांची सुरक्षा यासंदर्भात पुरेशा व महत्त्वाच्या अशा कायदेशीर तरतुदी असताना; पण त्यांचा आवश्यक असूनही अपेक्षित व पुरेशा प्रमाणात अवलंब होत नाही. labour-safety-industry परिणामी, कुठल्या ना कुठल्या कारणाने औद्योगिक अपघातांचा सामना सर्वांना करावा लागतोच. अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात. भीषण स्वरूपातील अपघातांच्या संदर्भात नागराज कृष्णन् यांनी अनुभवसिद्ध अशी विशेष टिप्पणी केली असून ती नेहमीच चिंतनीय ठरली आहे. त्यांनी विशेषतः औषध उत्पादक कंपन्यांमधील मोठ्या व गंभीर स्वरूपातील अपघातांचा अभ्यास करून नमूद केलेली बाब म्हणजे औषध निर्माण कंपन्या, त्यांची उत्पादन पद्धत व प्रक्रियेच्या पालन करण्यावर जेवढा आग्रही जोर देतात, त्या तुलनेत या कंपन्या उत्पादन क्षेत्राशी निगडित व तेवढ्याच महत्त्वाच्या व अत्यावश्यक अशा उत्पादन-प्रक्रिया व मानवीय सुरक्षा या मुद्यांकडे पुरेसे लक्ष देत नाही.
 
 
औषध निर्माण क्षेत्रात असणाऱ्या विविध प्रकारांच्या गंभीर प्रक्रियांमुळे मशीन-माणूस या उभयतांचे मोठे नुकसान औषध उद्योगातील अपघातांमुळे होते. labour-safety-industry तसे पाहता, श्रमिक क्षेत्र हे आपल्या घटनेनुसार केंद्र व राज्य अशा उभय सरकारांकडे असले, तरी या संदर्भातील कामगार कायद्यांपासून, पर्यावरण संरक्षण, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व कामगार कल्याण या विषयांची अंमलबजावणी करण्याचे व काम राज्य सरकारकडे असते. यासाठी प्रत्येक राज्य सरकारची आपापल्या गरजांनुसार स्वतंत्र यंत्रणा व व्यवस्था आहे. या व्यवस्थेतून विशेषतः कामगार आरोग्य व सुरक्षा यांसारख्या महत्त्वाचा विषयावर प्रबोधन प्रशिक्षणापासून कायदेशीर कारवाई करण्यापर्यंतचे प्रयत्न केले जातात. labour-safety-industry त्यामुळे जबाबदारीची जाणीव विविध स्तरांवर निर्माण झालेली असली तरी औद्योगिक क्षेत्रात व त्यातही विशेषतः जोखमीच्या कामाच्या संदर्भातील कामगार सुरक्षेचे आव्हान मात्र कायम आहे.
 
 
उद्योग व कामगार क्षेत्रातील विषयतज्ज्ञांनुसार कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक उलाढालींपैकी दोन टक्क्यापर्यंतची राशी आपल्या उद्योग-व्यवसायाशी संबंधित पर्यावरण संरक्षण, कामगार आरोग्य व सुरक्षा या विषयांवर प्रशिक्षण, संशोधन, सुधारणा इत्यादींवर करणे आवश्यक करण्यात आले आहे. labour-safety-industry मात्र, याला मूलभूत व मुख्य तरतुदीची अंमलबजावणी होतेच असे नाही. परिणामी उद्योग क्षेत्रातील कामांच्या संदर्भातील अपघात-अनारोग्य, जखमी होणे व प्रसंगी औद्योगिक अपघातातून कायमचे अपंगत्व व मृत्यू या जोखमीच्या स्थितीचा सामना अनेकांना करावा लागतो. यातच भर पडते ती आग आणि आगींमुळे होणाऱ्या विविध अपघातांची ! labour-safety-industry छोट्या-मोठ्या आगींमुळे होणारे अपघात सोडा; पण मोठ्या भीषण व कारखान्यात जीवघेण्या ठरलेल्या आगींमुळे गेल्या सहा महिन्यांत देशपातळीवर झालेल्या बहुचर्चित आगींच्या अपघातांचा गोषवारा पुढीलप्रमाणे मांडता येईल.
तारीख उद्योगाचा प्रकार औद्योगिक अपघाताचे स्थान labour-safety-industry
४ नोव्हेंबर : औषध निर्माण, पुद्दुचेरी
३ नोव्हेंबर : औषध प्रक्रिया; महाड-रायगड
१३ ऑक्टोबर : औषध निर्माण; तेलंगणा
४ ऑक्टोबर : औषध उत्पादन; अमृतसर
१२ सप्टेंबर : औषध निर्माण; पियमपूर (इंदूर)
२९ जुलै : औषध प्रक्रिया; वाळूज, महाराष्ट्र
हे सर्वज्ञात आहे की, रसायन उद्योगांतर्गत येणाऱ्या औषध प्रक्रिया उद्योगांमध्ये कच्चा माल संग्रह हाताळणे, त्यावर प्रक्रिया करणे हे अत्यंत जिकिरीचे असते.
 
 
labour-safety-industry त्यासाठी जाणकार, अनुभवी व शिक्षित-प्रशिक्षित कर्मचारी-अधिकारी प्रक्रिया तज्ज्ञांची आवश्यकता असते. या मुद्याला अधिक गती मिळावी, यासाठी संस्थागत स्तरावर २००० साली इंडियन फार्मास्युटिकल्सने आपल्या सर्व सदस्य कंपन्यांसाठी कारखाने व औषध निर्माण प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्यांचा बारकाईने व तपशीलवार अभ्यास विचार करून विशेष मागदर्शन मुद्दे संकलित करून वितरित केले. त्याचा पुढे सदस्य कंपन्यांनी अवलंब करावा, यासाठी विशेष कार्यशाळा, मार्गदर्शक सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. मात्र, त्याला सातत्याने व्यापक स्वरूप देणे आवश्यक होते.
औद्योगिक अपघात व विशेषतः जीवितहानी होणाऱ्या अपघातप्रसंगी अपघाताचे गांभीर्य पाहता शासन-प्रशासनाची भूमिका सद्यःस्थितीत कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची असते. labour-safety-industry मात्र, या कठोर कायदेशीर कारवाईला विशेष प्रशिक्षण, सराव-अनुभव, सुरक्षेसह कामकाजाचा प्रसार-प्रचार करून ज्याप्रमाणे रसायन-औषध उद्योगात उत्पादनांच्या दर्जावर जेवढा भर दिला जातो, तेवढाच भर कामाच्या ठिकाणी कर्मचारी कंपनीच्या सुरक्षेवर देणे, हाच या प्रकरणी कायमस्वरूपी व परिणामकारक तोडगा ठरू शकतो.
९८२२८४७८८६