ठाणे,
Mumbai Child missing Case : महाराष्ट्रात नवी मुंबईतील विविध भागातून 24 तासांत चार अल्पवयीन मुली आणि दोन मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी एकाचा शोध लागला आहे. पोलिसांनी आज मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 डिसेंबर दरम्यान 12 ते 15 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुले बेपत्ता झाली. सहा मुलांपैकी कोपरखैरणे येथून सोमवारी बेपत्ता झालेला 12 वर्षांचा मुलगा नंतर ठाणे रेल्वे स्थानकावर सापडला आणि त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
इतर प्रकरणांची माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, Mumbai Child missing Case कळंबोली भागातील एक 13 वर्षीय मुलगी रविवारी तिच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला गेली आणि परत आलीच नाही. आणखी एका घटनेत, पनवेलमधील 14 वर्षीय तरुणी रविवारी तिच्या मित्राच्या घरी धार्मिक मेळाव्याला गेली आणि घरी परतली नाही. कामोठे परिसरातून 12 वर्षीय मुलगी सोमवारी घराबाहेर पडून बेपत्ता झाली.
दुसरी 13 वर्षीय मुलगी सोमवारी शाळेसाठी रबाळे Mumbai Child missing Case परिसरातील आपल्या घरातून निघाली होती, मात्र ती परतली नाही. याशिवाय, रबाळे येथील एक 13 वर्षांचा मुलगा सोमवारी पहाटे सार्वजनिक शौचालयात गेला आणि तेव्हापासून त्याचा शोध लागला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.