छ. संभाजीनगर,
time violation सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी जागोजागी सभा, मोर्चे, मिरवणुकांचा धडाका लावला आहे. time violation छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या रॅलीतील सहा आयोजकांविरुद्ध पोलिसांनी दिलेल्या वेळेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
२ डिसेंबर रोजी कन्नड शहरात मनोज जरांगे यांच्या रॅलीसाठी आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी रॅलीला संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, रविवारी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, परवानगी मागताना आयोजकांनी नमूद केलेल्या वेळेचे उल्लंघन करीत रॅली रात्री ११ वाजता सुरू झाली time violation आणि मध्यरात्री १२.४० वाजता संपली. रॅलीमध्ये मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक सुरू असल्याने जवळपासच्या रहिवाशांना त्रास होत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. सहा आयोजकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यासाठी जरांगे महाराष्ट्राच्या काही भागात दौरे करीत आहेत.