Baitul बैतुल विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नवनिर्वाचित आमदार Baitul हेमंत खंडेलवाल यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांची भेट घेतली आणि मध्यप्रदेशातील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले.
Baitul नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश प्राप्त केले, त्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांची नवनिर्वाचित आमदार हेमंत खंडेलवाल यांनी भेट घेतली. खंडेलवाल यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व प्रदेशाध्यक्ष शर्मा यांनी बैतुल जिल्ह्यातील पाचही जागा जिंकल्याबद्दल जिल्हा भाजपा संघटनेसह भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. बैतुल जिल्ह्यात सर्वांत मोठा विजय मिळवल्याबद्दल चौहान आणि शर्मा यांनी आमदार खंडेलवाल यांचे अभिनंदन केले.
Baitul खंडेलवाल यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिवराजसिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि मध्यप्रदेश सरकारच्या लोकहितैषी धोरणांमुळे तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. मध्यप्रदेशात पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनता आणि भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा म्हणाले की, केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारची धोरणे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मध्यप्रदेश प्रगती करीत आहे.