तभा वृत्तसेवा
हिवरासंगम,
attack of worms नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या खरीप आणि रबी पिकांची वाट लावली. शेतकर्यांनी खरीप पिकाची उणीव भरुन काढण्यासाठी रब्बी हंगामातील नगदी पिक म्हणून हरभरा पिकाकडे पाहीले. परंतु हरभरा व तुर पिकावर अळीच्या आक्रमणाने हरभरा पिक भुईसपाट होत असुन शेतकर्यांसमोर नविनच संकट उभे ठाकले आहे.
हरभरा पिकाची नुकतीच लागवड करुन कोवळे रोप जमिनीच्या वर आली आहे. पंरतु त्याच्यावर अळीने आक्रमण केल्याने हराभरा पिक भुईसपाट होत आहे. काळपट व अंगावर पांढर्या ठीपक्याची असलेली ही अळी दिवसभर जमिनीत राहुन रात्रीच्या वेळी पिकावर आक्रमण करते. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. attack of worms नुकतीच जमिनीवर आलेली कोवळी रोपे अळी उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तरी कृषी विभागाने योग्य ते उपाययोजना करावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे.