मुंबई,
License भारतीय रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलत सोमवारी कोल्हापुरातील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द License केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने ही कारवाई केली आहे.
License कारवाईबाबत रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँक ४ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. बँकेत ठेवी स्वीकारण्यास कींवा पैसे घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशांबाबत सविस्तर माहिती देताना रिझर्व्ह बँकेने सांगितले की, या सहकारी बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नाही. यासोबतच भविष्यात कमाईच्या साधनांबाबत कोणतीही ठोस योजना मांडण्यात बँक अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचे पालन होत नसल्याने आणि ग्राहकांचे हित लक्षात घेत आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्राहकांच्या पैशांचे काय?
बँकेचा परवाना रद्द License केल्यानंतर बँकेत जमा झालेल्या ग्राहकांच्या पैशांचे काय होणार, हा सर्वांत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते. ही भारतीय रिझर्व्ह बँकेची उपशाखा आहे, जी ५ लाख रुपयांपर्यंत विमा सुविधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी ५ लाख रुपये कींवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील, तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ग्राहक केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतील.