इम्रान खान विरोधातील याचिकेवर निर्णय सुरक्षित

05 Dec 2023 22:04:08
इस्लामाबाद,
Pakistan court पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना Pakistan court पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या (पीटीआय) प्रमुख पदावरून हटवण्याच्या याचिकेवरील निर्णय सुरक्षित ठेवला आहे. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इम्रान खान ५ ऑगस्टपासून तुरुंगात आहेत.
 
 
Imran Khan
 
Pakistan court तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तोशखान्यातून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न जाहीर न केल्यामुळे ईसीपीने त्यांना या प्रकरणात अपात्र ठरवले होते. ३ ऑक्टोबर रोजी इम्रान खान यांना त्यांच्या स्वत:च्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षात कोणतेही पद धारण करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांनी इस्लामाबादमधील ईसीपी मुख्यालयात सुनावणी केली. सुनावणीदरम्यान पक्षाचे वकील शोएब शाहीन म्हणाले की, पक्षाने नवा अध्यक्ष निवडल्यामुळे ही याचिका निरर्थक ठरली आहे.
 
Powered By Sangraha 9.0