मेष (Aries Rashi )
आजच्या दिवशी शिक्षण आणि अध्यात्मिक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तसंच बाहेरील खाद्यपदार्थ खाणं टाळावं.
वृषभ (Taurus )
आजच्या दिवशी तुमचा दिवस काही प्रमाणात संघर्षमय असणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत.
मिथुन (Gemini Rashi)
या राशींच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ होणार आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेली कामं मार्गी लागू शकतं. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer )
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्यास मार्ग उपलब्ध होतील. व्यपारासंदर्भात कोणताही निर्णय घेताना गोंधळात पडाल.
सिंह (Leo Rashi )
घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या योग्य मार्गदर्शनामुळे प्रगती होणार आहे. व्यवसायामध्ये आजच्या दिवशी चांगला नफा होईल.
कन्या (Virgo )
आजच्या दिवशी वायफळ खर्च करणं टाळावं. तसंच तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळवू शकाल.
तूळ (Libra Rashi )
तुमच्या हातून काहीतरी धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे. तुम्ही जर आज इतरांशी बोलाल तर प्रगती कराल. बोलताना शब्द जपून वापरावे.
वृश्चिक (Scorpio )
आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. प्रगतीच्या योगामध्ये तुम्हाला सावध असणं फार गरजेचं आहे. आजच्या दिवशी घरच्याशी वाद घालू नका.
धनु (Sagittarius Rashi )
आजच्या दिवशी नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहणार आहात. तसंच व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे.
मकर (Capricorn )
तुमच्या घरी आज आनंदाची बातमी येणार आहे. धार्मिक विधींसाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांची आज मदत होणार आहे.
कुंभ (Aquarius )
आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं खूप कौतुक होईल. तसंच नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकता.
मीन (Pisces Rashi)
या राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भात महत्त्वाची बातमी मिळणार आहे. मित्र आणि नातेवाईकांची साथ तुम्हाला लाभणार आहे.