तळेगाव दशासर शंकरपट तयारीला सुरवात

कृषक सुधार मंडळाची बैठक

    दिनांक :05-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
तळेगाव दशासर,
Talegaon Shankarpat : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तळेगावचा शंकरपट यावर्षी सुद्धा पूर्वी प्रमाणेच 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. स्व. नानासाहेब देशमुख यांनी सुरू केलेला हा शंकरपट स्व. बापूसाहेब देशमुख यांनी चालविलेला तसेच या परंपरेत भर टाकत रावसाहेब देशमुख यांनी महिला पटाची सुरवात केली. सध्या कृषक सुधार मंडळाचे शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात कृषक सुधार मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, स्वयंसेवक गावकरी मंडळी सुद्धा मोठ्या जोमाने तयारीला लागली असून त्यानिमित्ताने कृषक सुधार मंडळाच्या सदस्यांची बैठक देशमुख यांच्या वाड्यात आयोजित करण्यात आली होती.
 
Talegaon Dashasar Shankarpat
 
तळेगाव शंकरपटात Talegaon Shankarpat महाराष्ट्राच्या विविध भागातून बैलजोड्या भाग घेण्यासाठी येतात. एकंदरीत मोठे आयोजन येथे करण्यात येते. त्यामुळे मोठ्या तयारीची सुद्धा गरज असते. या अनुषंगाने विविध विभाग करून कामाची विभागणी कृषक सुधार मंडळाच्या कार्यकर्त्यांना करून दिली व कार्यकर्ते सुद्धा ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
 
 
यावेळी कृषक सुधार मंडळाचे सचिव आनंद देशमुख, सुयश देशमुख, रवी चुटे, पोमेश थोरात, माणिक बगाडे, रामप्रसाद चन्नव, नरेंद्र रामावत, डॉ. विनोद देशमुख, अशोक गायकवाड, पंकज गायकवाड, श्याम घाटे, प्रशांत साखरकर, गोविंद कामडी, पंकज देशमुख, संजय हागे, गुणवंत झिटे, किशोर मेश्राम, वाढोणा येथील सरपंच प्रशांत हुडे, विवेक सराफ, राजू नागरीकर, दिवाकर ठाकरे आदी उपस्थित होते.