फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार मुलांना सांगा : कुथे

05 Dec 2023 18:22:37
गोंदिया,
Rupesh Kuthe : समस्त समाजाला आता एकात्रीत येऊन आपल्या सामाजिक आर्थिक, शैक्षणिक आणि राजनैतिक उद्धारासाठी लढा देण्याची वेळ आली आहे. सर्वांनी एकत्रित येऊन सुख दुःखात सोबत राहून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार मुलाबाळांना सांगावे, असे प्रतिपादन कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे Rupesh Kuthe यांनी केले.
 
Rupesh Kuthe
 
ते तालुक्यातील मरारटोला (काटी) येथे समस्त माळी समाज बांधवांतर्फे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलत Rupesh Kuthe होते. याप्रसंगी गावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संध्याकाळी दगळी चाळ काटीद्वारा अल्पोहर वितरित करण्यात आला. कार्यक्रमाला राजू तुरकर, पंस सदस्य राजेश जमरे, चंद्रकुमार चौव्हाण, आलोक असाटी, अतुल कोल्हटकर, कैलाश काळबांधे, अजय जमरे, धर्मेंद्र तुरकर, धर्मेंद्र धार्मिक, मदन बनकर, शिव भोयर, गजेंद्र देवधारी, शाम तिजारे, प्रकाश तिजारे, राजू हलमारे, लोकेश हलमारे त्यांच्यासह समाजबांधव व गावकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0