मतदानोत्तर चाचण्यांना वजन का येत नाही?

assembly-results 2023 मतदानोत्तर चाचण्यांचा हेतू

    दिनांक :05-Dec-2023
Total Views |
प्रासंगिक 
- राहुल गोखले
assembly-results 2023 पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काही प्रमाणात धक्कादायक ठरले आहेत, हे नाकारता येणार नाही. या धक्क्याला कारणीभूत आहेत ते मतदानोत्तर जाहीर झालेले कल (एक्झिट पोल). मतदानपूर्व चाचण्या आणि मतदानोत्तर कल यांत अंतर असते.assembly-results 2023  मतदानपूर्व चाचण्या या जनमताचा कल कसा असू शकतो, याकडे अंगुलिनिर्देश करणाऱ्या असतात आणि त्यामुळे त्याकडे अंतिम निकालांच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नसते. assembly-results 2023 तथापि, मतदानोत्तर चाचण्यांचे तसे नसते; मतदारांनी केलेल्या प्रत्यक्ष मतदानाच्या माहितीवर ते कल आधारित असतात आणि साहजिकच ते अंतिम निकालांच्या जवळ जाणारे असावेत, असे अभिप्रेत असते. मात्र, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने चुकत आले आहेत. त्यातून स्पष्टता येण्याऐवजी गोंधळ जास्त उडत आहे. assembly-results 2023 यावेळीही जाहीर करण्यात आलेले कल आणि अंतिम निकाल हे सुसंगत नाहीत, असे आढळले आहे. निकाल धक्कादायक ठरण्यात या चुकीच्या ठरलेल्या अंदाजांचा मोठा वाटा असतो आणि आहे. म्हणूनच मतदानोत्तर चाचण्यांच्या अचूकतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
 
 

assembly-results 2023 
 
 
वास्तविक अशा मतदानोत्तर चाचण्यांचा हेतू काय हे तपासून पाहिले पाहिजे. निवडणूकशास्त्राच्या अभ्यासात भर पडावी या उद्देशाने त्या करण्यात येत असतील तर ते स्वागतार्ह मानले पाहिजे. assembly-results 2023 कोणत्याही शास्त्रात ज्ञानाची भर पडत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मात्र, अशी ज्ञानाची भर पडत असेल तर त्याचे प्रतिबिंब अशा मतदानोत्तर चाचण्यांच्या वाढत्या अचूकतेमध्ये पडायला हवे. तसे होताना दिसत नाही. या चाचण्यांचे जाहीर होणारे कल आणि प्रत्यक्ष निकाल जाहीर होणे यात फार कमी अवधी शिल्लक असतो. तेवढ्या कालावधीत मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर करण्यात नक्की हशील काय? हाही प्रश्न आहेच. भारतात निवडणुका या अनेक फेऱ्यांमध्ये होत असतात. assembly-results 2023 मात्र, दोन फेऱ्यांमधील काळात हे कल जाहीर करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी नसते. याचे कारण हे कल पुढील मतदानावर प्रभाव टाकू शकतील, अशी साशंकता असते. तेव्हा सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यावर मगच एकत्रित कल जाहीर करता येतात. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर झाले आणि ३ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष निकाल लागले.
 
 
assembly-results 2023 याचा अर्थ त्यात केवळ दोन दिवसांचे अंतर होते. त्यात हे कल जाहीर करण्याचे नेमके प्रयोजन काय, हा प्रश्न अप्रस्तुत नाही. हे कल अचूकतेच्या नजीक जाणारे ठरले तर ते जाहीर करण्यासही हरकत नाही. परंतु, त्यात अचूकतेचा लवलेश क्वचितच असताना हा सगळा खटाटोप करण्याचे प्रयोजन काय, याचाही गांभीर्याने विचार करावयास हवा. हे कल ज्यांना अनुकूल असतात ते या चाचण्यांचे समर्थन करतात आणि कल ज्यांच्या विरोधात जाणारे असतात ते प्रत्यक्ष निकालांची प्रतीक्षा करा, अशी भूमिका घेतात. assembly-results 2023 हे आता सगळे इतके साचेबद्ध झाले आहे की, निवडणूकशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात येणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांना आता सवंग रूप आले आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करावयास हव्यात. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने इंडिया शायनिंग इत्यादी घोषणा दिल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये त्याचे प्रतिqबब पडलेले दिसले. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किमान २४० ते २५० जागा मिळतील, असा अंदाज या चाचण्यांनी व्यक्त केला होता. assembly-results 2023 प्रत्यक्षात काँग्रेस आणि मित्रपक्षांना २१६ जागा जिंकता आल्या. आता त्यालाही २० वर्षे होतील. तरीही या चाचण्यांमधील अचूकता वाढावी म्हणून पुरेशा चाळण्या लावल्या जात नाहीत, हे आश्चर्यकारक आहे.
 
 
 
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसप्रणीत संपुआच्या विरोधात मोठे वातावरण होते, यात शंका नाही. तेव्हा मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपा आणि मित्र पक्षांची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त केला असला, तरी भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता येईल, असे भाकीत कोणी केले नव्हते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जास्तीत जास्त २८९ जागा मिळतील, असे या चाचण्या सांगत होत्या. assembly-results 2023 मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि काँग्रेसप्रणीत आघाडीला अवघ्या ६० जागा मिळाल्या. मतदानोत्तर चाचण्यांनी या आघाडीला किमान १०० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. याचाच अर्थ अंदाज जवळपास ५० टक्क्यांनी चुकला होता. कर्नाटकात गेल्या मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशा चाचण्या करणाऱ्या काहींनी काँग्रेसला सत्ता मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता; एका एजन्सीने भाजपाला सत्ता मिळेल असे भाकीत केले होते तर अन्य काही एजन्सींनी त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तविला होता. assembly-results 2023 आता झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेशात भाजपाची सत्ता येईल किंवा काँग्रेसची सत्ता येईल असे परस्परविसंगत अंदाज व्यक्त झाले होते.
 
 
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सत्तेत पुनरागमन होणार याबद्दल काही मतदानोत्तर चाचण्या खात्री देत असताना काही चाचण्या या दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत होईल, असे भाकीत केले होते. मात्र, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे अपवादात्मक भाकीत एखाद्या चाचणीने केले होते. तेव्हा या चाचण्यांचे कल का चुकतात यावर गांभीर्याने विचार व्हावयास हवा आणि चाचण्यांच्या प्रक्रियेत उणिवा आढळतील तेथे उपाय योजणे निकडीचे आहे. assembly-results 2023 या चाचण्यांमधून व्यक्त होणाऱ्या अंदाजांमध्ये संदिग्धता असणारच हे जरी गृहीत धरले तरी अंदाज आणि निकाल हे परस्परांना छेद देणारे असता कामा नयेत, ही अपेक्षा अवाजवी नाही. मतदारांना विचारले जाणारे प्रश्न- मतदार वेगवेगळ्या एजन्सींना वेगवेगळी उत्तरे देतात का? ज्यावरून अंदाज बांधला जातो तो नमुना आकार पुरेसा आणि प्रातिनिधिक आहे का? ज्या जागांवर या चाचण्या घेण्यात येतात तेथे एक-दोन टक्क्यांनी निकाल बदलू शकतात हे लक्षात घेऊन आकडेमोड केलेली असते का? assembly-results 2023 अंदाज व्यक्त करण्यासाठी आवश्यक पुरेसा विदा (डेटा) उपलब्ध असतो का? माहितीचे विश्लेषण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि वेळ दिला जातो का? मतदारसंघातील मतदारांचे मिश्र प्रमाण लक्षात घेऊन नमुने गोळा केले जातात का?
 
 
पहिल्यांदाच मतदान करणारे आणि अगोदरच्या निवडणुकीचा निकाल यांचा संबंध तपासला जातो का? इत्यादी अनेक दोषभेगा या प्रक्रियेत असू शकतात. assembly-results 2023 मुळात आधारच ठिसूळ असेल तर त्यातून व्यक्त झालेले अंदाजदेखील बेभरवशाचे असणार, हे निराळे सांगायला नको. म्हणूनच या चाचण्या करणाऱ्यांनी त्या बाबतीत सखोल अभ्यास, प्रक्रिया निश्चिती आणि विश्लेषण यावर भर द्यायला हवा. अपवादात्मक एखादा अंदाज बरोबर आला म्हणजे तो नियम बनत नाही. निवडणूक ही लोकशाहीतील अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. assembly-results 2023 त्याच्याशी निगडित मतदानोत्तर चाचण्यांमध्येदेखील तेच गांभीर्य टिकवायला हवे. काही तास त्या अंदाजांवर चर्चा करायची आणि प्रत्यक्ष निकालांनी त्या चाचण्यांतून आलेल्या अंदाजांना वाकुल्या दाखवायच्या, हे प्रगल्भतेचे लक्षण नव्हे. मतदानोत्तर चाचण्या हव्यात; पण त्यात जास्तीत जास्त अचूकता यायला हवी. त्यांना क्षणिक करमणुकीचे स्वरूप येता कामा नये; त्या हास्यास्पददेखील ठरता कामा नयेत.
९८२२८२८८१९