घरात बसणाऱ्यांना ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे महत्त्व काय कळणार

    दिनांक :05-Dec-2023
Total Views |
बीड,
program सलग अडीच वर्षे जे लोक घरातच बसून राहिले, त्यांना ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे program महत्त् काय समजणार. या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणणे, म्हणजे या ठिकाणी उपस्थित सामान्यांचा अपमान करणे होय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.
 
 
Shasan Aplya Dari'
 
बीड जिल्ह्यातील परळी येथे ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे program आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार पंकजा मुंडे उपस्थित होते. आतापर्यंत झालेल्या ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमांपैकी आजचा कार्यक्रम सर्वाधिक यशस्वी झाला. या कार्यक्रमात झालेली गर्दी विक्रमी अशीच आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २० कार्यक्रम झाले आणि १ कोटी ८४ लाख लोकांनी योजनेचा लाभ घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
 
सरकारचा हा बोगस कार्यक्रम program आहे, असे काही जण म्हणतात. अनेक लोक लाभ घेऊन गेले. जे अडीच वर्षे घरी बसले, त्यांना काय कळणार या कार्यक्रमाचे महत्त्व. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोठ्या प्रमाणात लोक या कर्यक्रमाला येत आहेत. ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी असल्याचे मुख्यमंत्रि म्हणाले.
 
तुम्ही खरच राज्याचे एकनाथ : धनंजय मुंडे
मुख्यमंत्री तुम्ही खरच राज्याचे एकनाथ असल्याचे प्रशंसोद्गार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. सर्व एकत्रित मिळून या जिल्ह्याचा विकास करू, असे आवाहन त्यांनी केले.