जयपूर,
Karni Sen : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची मंगळवारी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येतील दोन आरोपींची पोलिसांना ओळख पटवली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय राजस्थान पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष कृती दल अर्थात् एसआयटी गठीत करण्यात आले आहे.
मकराना नागौर येथील रोहित राठौर आणि हरयाणातील महेंद्रगडचा नितीन फौजी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नवीन शेखावत, रोहित राठोड आणि नितीन फौजी यांनी देणगी देण्याच्या बहाण्याने Karni Sen करणी सेनेच्या प्रमुखाची भेट घेतली होती. हत्येसाठी नवीनने तीन दिवसांपूर्वी मालवियनगर येथील एजन्सीकडून प्रतिदिन पाच हजार रुपये भाड्याने एक एसयूव्ही कार घेतली. गोगामेडी यांच्या निवासस्थानी कार सोडून गेले होते. कारमधून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. गँगस्टर रोहित गोदारा याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
सोशल मीडियावर तशी पोस्टही त्याने शेअर केली. रोहित गोदारा हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. Karni Sen करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी आणि रोहित गोदारा यांच्यात जमिनीवरून वाद होता, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मात्र, पोलिस या प्रकरणाचा अन्य बाजूंनीही तपास करीत आहेत. विजेंद्रसिंह या मालमत्ता खरेदी-विक्री करणार्या एजंटची गेल्या वर्षी हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील आरोपी हे करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह यांचे निकटवर्ती होते. या हत्येचा सूड घेण्यासाठी सुखदेव यांची हत्या झाली असावी, असाही प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.