शेअर बाजारांतील सात सत्रांच्या तेजीला ‘ब्रेक'

    दिनांक :07-Dec-2023
Total Views |
मुंबई :
stock market आशियाई बाजारांतील नकारात्मक संकेत आणि नफेखोरीमुळे शेअर बाजारांतील सात दिवसांच्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. stock market मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३२ अंकांनी घसरून ६९,५२१ अंकांवर आला.
 
 
stock market
 
दिवसभराच्या सत्रात निर्देशांकाने ६९,३२० अंकांपर्यंत घसरण अनुभवली. राष्ट्रीय stock market शेअर बाजाराचा निफ्टी ३६ अंकांनी घसरून २०,९०१ या पातळीवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकारांनी केलेल्या विक्रीमुळे ही घसरण झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले. आजच्या सत्रात भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील आणि आयटीसी कंपन्यांची सर्वाधिक घसरण झाली.