तभा वृत्तसेवा
अमरावती,
MLA Sulabha Khodke : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजा दरम्यान वर्ष 2023-2024 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यामध्ये अमरावतीच्या विकासाला घेऊन आ. सुलभा खोडके MLA Sulabha Khodke यांनी सादर केलेल्या मागणीनुसार 121 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाने जारी केलेल्या खर्चाचे पूरक विवरण पत्र 2023-2024 मध्ये सदर बाब अधोरेखित करण्यात आली आहे. अमरावतीच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 200 खाटांच्या नूतन इमारतीमध्ये विद्युतीकरण व फर्निचरच्या कामाकरिता 15 कोटींचा निधी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकरिता 66 कोटी, चित्रा चौक ते नागपुरी गेट उउड्डाणपुलाच्या अतिरिक्त लांबीचे बांधकाम व विद्युतीकरणासाठी 10 कोटी, शेगांव ते रहाटगांव पर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी 10 कोटी तसेच राजपूत ढाबा ते चांगपूर फाटापर्यंत रस्ता चौपदरीकरण व काँक्रीटीकरणांसाठी 20 कोटी, असा एकूण 121 कोटीचा निधी देण्यात आला आहे. MLA Sulabha Khodke आ. खोडके यांचे मंजूर उपरोक्त निधीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अनेकवेळा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र व्यवहार केला. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे. लवकरच हा निधी संबंधित बांधकाम आस्थापनेला उपलब्ध होणार असून कामाला सुरुवात होणार आहे.