हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 51 कोटी 31 लाख रूपये मंजूर

07 Dec 2023 19:45:25
बुलढाणा,
Nagpur winter session : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात 51 कोटी 31 लाख रुपये ची विकास कामे मंजूर करून घेतली आहे. दि. 7 डिसेंबर रोजी गुरुवारी नागपूर येथे आयोजित हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुलढाणा आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.
 
Nagpur winter session
 
बुलढाण्यात जिल्हा न्यायाधीशाने पाच दिवाणी न्यायाधीश व मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकरिता पाच दहा निवासस्थाने उभारण्याची मागणी केली होती. निवासस्थानासाठी 7.86 कोटी रुपयाचा निधी मागणी केली होती सार्वजनिक बांधकाम उपविभाग बुलढाणा अंतर्गत कामास मंजुरी Nagpur winter session मिळाली आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील राजुर गुळवेली रस्ता वरील पुलाच्या कामासाठी तीन कोटी 52 लाख रुपये ची मागणी करण्यात आली होती सदर मागणी देखील मंजूर करण्यात आली आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गतच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील वरवंड ते खेडी रस्त्याच्या विकासासाठी 58 लाख मतदारसंघातील वडगाव महाळुंगी रस्त्याची सुधारण्यासाठी 53 लाख बुलढाणा जिल्ह्यातील दहिद बु ते जरी रस्त्याच्या सुधारण्यासाठी 98 लाख गुंमी ते जुनून रस्त्याच्या सुधारण्यासाठी 96 लाख रुपये भादोला ते वरवंड रस्त्याची लांबी सुधारण्याकरिता 66 लाख रुपये कुरा गोतमारा रस्त्याच्या सुधारण्यासाठी 98 लाख रुपये जळगावकरिता कोंडेवाडी भागात Nagpur winter session रस्ता रुंदीकरणासाठी 65 लाख रुपये धामणगाव बढे येथे पानेरा रस्त्याच्या सुधारण्यासाठी एक कोटी 43 लाख रुपये धामणगाव बढे ते पंचलिंग देवस्थान रस्ता सुधारण्यासाठी एक कोटी 43 लाख रुपये रस्ता तसेच गावातील रस्त्याची लांबीची सुधारणा करणे करिता 79 लाख रुपये पाणी पुरवठा विहीर ते स्मशानभूमी धामणगाव बढे रस्त्याच्या सुधारणेसाठी 98 लाख रुपये मोताळा तालुक्यातीलच खरबडी ते शिरवा रस्त्याच्या सुधारणे करिता दोन कोटी तेरा लाख एकूण बारा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
 
 
तर बुलढाणा जिल्ह्यातील शेंबा जयपुर कोथळी तरोडा वरवंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सात कोटी चाळीस लाख रुपये शेंबा जयपूर कोथळी तरोडा वरवंड रस्ता वरील फुलाच्या कामासाठी तीन कोटी रुपये मलकापूर पिंपळगाव देवी धामणगाव बढे रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करिता दोन कोटी रुपये भादोला वाडी ते रुईखेड टेकाळे ची सुधारणे करिता तीन कोटी दहा लाख रुपये पिंपळगाव देवी धामणगाव बढे रस्त्यावरील लहान पूलांच्या कामाकरिता दोन कोटी बावीस लाख रुपये माळवीर पोखरी खु रस्ता वरील लहान पुलाचे बांधकामाकरिता 90 लाख रुपये यासह इतर Nagpur winter session विकासकामासाठी एकूण बुलढाणा विधानसभा मतदारसंघात डिसेंबर 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पात एकूण 51 कोटी 31 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0