अमरावती जिल्हात ओला दुष्काळ घोषित करा

07 Dec 2023 20:28:21
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
MLA Ravi Rana : जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अनेक मागण्या आ. रवि राणा यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन केल्या.
 
MLA Ravi Rana
 
सिंभोरा धरणापासून अमरावती शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याकरिता एक हजार कोटी रुपये मंजूर करणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या समस्या, नवीन डेपो, कर्मचार्‍यांच्या मागण्या मंजूर करणे, अमरावती विभाग अंतर्गत दुष्काळ घोषित करणे, सरसकट शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याबाबत, कोळी महादेव समाजाच्या जात प्रमाणपत्राची समस्या सोडविणे, चिखलदरा स्कायवॉक सुरू करणे, गणोरी येथील रुग्णालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करणे, शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मागण्या मंजूर करणे, जिल्ह्यातील रिक्त जागा भरणे, हनुमान गढी भागाता तीर्थक्षेत्र दर्जा देणे, आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांच्या मागण्या मंजूर करणे, तीर्थस्थळ विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे, आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात यावे यासाठी गुरूवारी MLA Ravi Rana रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी शेखर बिसने, उमेश ढोणे हजर होते.
Powered By Sangraha 9.0