नागपूर,
Dr. Neilan Gorhe : मागील 4-5 वर्षात नागपूर-विदर्भाचे चित्र बदललय. विदर्भाच्या पायाभूत सुविधांमध्ये खुप वाढ झाली आहे. विदेशात विदर्भातील लोक मोठ्या प्रमाणात भेटतात. विदर्भाची सकारात्मक वाटचाल सुरू आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले. पत्रकार क्लब ऑफ नागपूरमध्ये आयोजित अनौपचारिक वार्तालापात डॉ. गोर्हे बोलत होत्या. विदर्भाचा विकास झाला आहे काय, आपल्याला काय वाटते, या प्रश्नावर डॉ. नीलम गोर्हे Dr. Neilan Gorhe म्हणाल्या की, मागील 4-5 वर्षात आधी चंद्रशेखर व नंतर नितीनजी गडकरी यांनी नागपूरचा चेहरामोहराच बदलून टाकला. उपराजधानीचे शहर म्हणावे, असा नागपुरात बदल झाला आहे.
विदर्भातील पायाभूत सुुविधामध्येही चांगलीच वाढ झाली आहे. समृद्धी महामार्ग हे एक उदाहरण घेता येईल. गोर-गरिबांना रोजगार मिळू लागला आहे, असे डॉ. गोर्हे म्हणाल्या. Dr. Neilan Gorhe त्या म्हणाल्या की नागपुरातील हे माझे 21 वे अधिवेशन आहे. अपवाद सोडला तर पूर्ण वेळ अधिवेशात उपस्थित राहिले आहे. डॉ. रूपा कुळकर्णी, लीलाताई चितळे यांच्याशी ओळख झाली. विविध आंदोलनाच्या निमित्ताने विदर्भात संपर्क वाढू लागला. विदर्भात आजही साधारण 2-3 महिन्यात दौरा असतोच असतो.
शक्ती कायदा तयार होतो आहे. गृह खात्याने काही क्युरीज काढल्या होत्या. तांत्रिक बाबीत तो अडकला आहे. असे असले तरी पीडितांनी पोलिसांच्या भरोसा सेलकडे जावे, अथवा 112 क्रमांकावर संपर्क साधला तरी तिला तातडीने मदत मिळेल. पण, समाज कधी पुढे येणार आहे. आरोपीवरील शिक्षेचे प्रमाण वाढायला हवे. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी संचालन केले. क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी स्वागत केले.
बळीचा बकरा
पक्षात जनाधार असलेल्या नेत्याला डावलले जात होते. मनोहर जोशींबाबत असे झाल्याचे बोलले जात होते. कोरोनानंतर हे अधिकरित्या जाणवायला लागले. ऐकूनच घेतले जात नव्हते. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. मात्र, त्यांचे ऐकले जात नव्हते. त्यांनी निर्णय घेतले तरी त्यावर अंमलच होत नव्हता. कारण, तसे सांगितले गेेले होते. पारदर्शीपणा राहिला नाही. संजय राऊत यांच्या बोलण्यात वैचारिक पातळी राहिलेली नाही. चांगल्या भाषेतही टीका करता येते. त्यांना पक्षाने बळीचा बकरा बनवलाय, असे पक्षातच बोलले जात असल्याचे नीलम गोर्हे Dr. Neilan Gorhe म्हणाल्या.