वेध
- प्रफुल्ल क. व्यास
food-wastage-rss अन्नाचे महत्त्व साधुसंतांनी सांगितले. संत गजानन महाराजांनी तर उष्ट्या पत्रावळीवरील शितं खाऊन उष्टे न टाकण्याचा मंत्र दिला. पण, मनुष्यप्राणी स्वत:मध्येच जास्त गुरफटलेला असल्याने फक्त स्वार्थात त्याला संतांची वचनं आठवतात. अन्य वेळी मात्र ‘जे स्वत:स भावे ते ते करावे स्वमर्जीने' असा स्वैराचार सुरू आहे. food-wastage-rss खरे तर ‘अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशाङ्क हे सर्वांना लागू असताना आम्ही मात्र ज्या अन्नाने पोट भरतो त्याची वारेमाप नासाडी करतो. आम्हाला ते समजते पण उमजत नाही, अशी परिस्थिती आम्हा शिक्षितांची झालेली आहे. तुळशी विवाहानंतर साधारणत: लग्नांचा सिझन सुरू होतो. सध्या तो सुरू झाला आहे. food-wastage-rss एका अहवालानुसार देशात येत्या तीन आठवड्यात ३८ लाख लग्न लागणार आहेत. १६ संस्कारांपैकी एक असलेला विवाह संस्काराचे आता स्पर्धा आणि दिखाव्यात (प्रदर्शनीत) बदल होतो आहे. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याच्या जवळ पैसा असेल तो तसा लग्नाचा बार उडवेल. food-wastage-rss अन्यथा भलेभले कोर्ट मॅरेजनंतर रिसेप्शन देऊन मोकळे होतात. आता खऱ्या अर्थाने ‘पोटात आणि ताटात' हा विषय येतो. तो म्हणजे जेवण!
ज्या वीतभर पोटासाठी राब राब राबले जाते, त्याच पोटाचा विचार न करता लग्नादी कार्यात ताटात घेऊन लागले नाही तर उष्टे टाकले जाते. तेच सध्या खुपते आहे. कधीही न खाल्ल्याप्रमाणे आणि पुढे कधीही मिळणार नाही, आत्ताच्या आता सर्व संपलेले असेल की काय, असे वाटल्यागत एकाच प्लेटमध्ये एकाच वेळी सर्व वाढून घेतले जाते. food-wastage-rss आपल्या पोटाची मशीन जेवढे हवे तेवढेच घेते; नंतर मात्र उलट्या काढते. मग, उरलेले सर्व उष्टे टाकले जाते. उष्टे टाकताना मात्र स्वत:च्या स्टेट्सचीही लाज बाळगली जात नाही. सध्या कोणत्या लग्नात किती वेगवेगळे पदार्थ होते याची चढाओढ लागलेली आहे. लग्न लागल्यानंतर वा रिसेप्शनमध्ये नवरदेव-नवरीला आशीर्वाद देऊन जेवण घेताना असलेली गर्दी; त्यामुळे अनेक जण बऱ्याच स्टॉलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तरीही आपल्याकडील लग्नात किती मेन्यू होते, याचा बडेजाव सांगणारे महाभाग समाजात आहेत. food-wastage-rss बरं, आपण एकदा हे मान्यही करू की खाऊ घालायला मनाचा मोठेपणा लागतो. त्यामुळे ज्याचे मन खाऊ घालण्यात मोठे त्याने तेवढा मोठेपणा दाखवला, असे म्हणता येईल. पण, खाणाऱ्याने किती खावे आणि उष्टे किती टाकावे, हे मात्र खाणाऱ्यालाच ठरवावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसात विवाहादी कार्यात उष्टे टाकू नका, असे सांगण्याची वेळ येणे हेच आमच्या सुसंस्कृत समाजाचे दुर्दैव आहे. तसे फलक लागत आहेत आणि लागण्याची गरज निर्माण होणे हे सुदृढ व सुशिक्षित समाजाचे लक्षण समजावे का? लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी लग्न कार्यात किती वऱ्हाड असावे यावर बंधनं टाकली होती. food-wastage-rss कोरोना काळात तर लग्नांवर मर्यादाच आल्या होत्या. कमी लोकांमध्ये लग्न लावण्याची अट टाकण्यात आली होती. तीच पद्धत पुढे रूढ होईल आणि कमीत कमी खर्चात विवाह समारंभ उरकवले जाईल, असे वाटू लागले होते. परंतु, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोरोनापूर्वीपेक्षाही बडेजाव करण्यात येत आहे. लग्न कार्यात अन्नाची नासाडी ही सर्वात गहन समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठीही सरकारी यंत्रणांनी पुढाकार घेण्याची वेळ समाजाने येऊ देऊ नये, यासाठी आपणच ‘जेवढे बसते पोटात तेवढेच घ्या ताटात'ची सुरुवात करण्याची वेळ आली आहे. food-wastage-rss यामागे सर्वात महत्त्वाचा विचार करण्यासाठी गरज आहे ती म्हणजे ‘महिने लागतात पिकवायला आणि मिनिट लागतो फेकायला' हे प्रत्येकाने ध्यानात घेऊन तसे अभियान राबवावे लागणार आहे.
सन २०२० मध्ये जोधपूर येथे अखिल भारतीय माहेश्वरी समाजाची महासभा आयोजित करण्यात आली होती. त्यात देश-विदेशातील ८० हजार प्रतिनिधी सहभागी झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या महासभेत प्रथमच अन्न वाया जाऊ नये यासाठी केलेला प्रयोग आमच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरवा. food-wastage-rss पहिल्या दिवशी काही स्वयंसेवकांनी भोजनगृहात पोटभर जेवण्याचा आग्रह केला. मात्र, उष्टे टाकू नये असे फलकही त्या ठिकाणी लावण्यात आले असताना अनेकांनी उष्टे टाकले आणि श्रीमंत आयोजकांपैकी असलेल्या स्वयंसेवकांनी आधी ते उष्टे संपवण्याची विनंती केली. मात्र, नकार येताच त्या स्वयंसेवकांनी ते उष्टे अन्न स्वत: खाल्ले! तिसऱ्या दिवशी मात्र त्याचा परिणाम जाणवला. एकाही प्लेटमध्ये उष्टे अन्न नव्हते. food-wastage-rss परंतु, हे उष्टे खाण्याची वेळ आपण दुसऱ्यावर का म्हणून येऊ द्यावी; नाही का? अन्नान्नदशा होण्यापूर्वी सावध व्हावे एवढेच !
९८८१९०३७६५