गोपालकाला : भागवत धर्मातील भक्तिप्रेम साधनेचा कळस

gopalkala-shrikrishna विशुद्ध प्रेमाशिवाय काही नको

    दिनांक :07-Dec-2023
Total Views |
साहित्य-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
gopalkala-shrikrishna वारकरी संप्रदायामध्ये काल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भागवत सप्ताह, कीर्तन महोत्सव, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण यांचे धार्मिक आयोजन असो की आषाढी कार्तिकीची वारी; या सर्व धार्मिक महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानेच होते. gopalkala-shrikrishna काला झाल्याशिवाय भक्तगण सभामंडप किंवा वारीत वारकरी पंढरपूर सोडत नाहीत. एका अर्थाने त्या त्या भक्तिप्रेम साधना मंदिराचा ‘काला' हा कळस आहे. काला म्हणजे परिपूर्णता. भारतात अनेक संप्रदाय आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत. पण वारकरी संप्रदायात सर्वांहून विशेष साधना आहे; ती म्हणजे गोपालकाला! gopalkala-shrikrishna काला फक्त वारकरी पंथातच आहे. काला म्हणजे ‘रक्षंतिस्म परस्परम्' आहे. परस्परातील सर्व भेद विसरायचे, स्वतःचे अस्तित्व विसरून जायचे आणि तन्मय अवस्थेत एकरूप व्हायचे. याला काला म्हणतात. श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनात अनेक लीला आहेत. त्यातील दोन लीला अद्भुत आणि अगम्य आहेत. gopalkala-shrikrishna एक रासलीला आणि दुसरी गोपालकाला ! रासलीला ही फक्त नि फक्त स्त्री भक्तांच्या सोबत दिसते. त्यात पुरुष भक्तांना कुठेच स्थान नाही तर गोपालकाला यात फक्त पुरुष भक्तांसोबत लीला पाहावयास मिळते. तिथे स्त्री भक्तांना स्थान नाही.
 
 

gopalkala-shrikrishna 
 
 
गोपालकाला हा देव आणि भक्तातील उत्कट प्रेमाचा साक्षात्कार आहे. गोपालकाला करताना साक्षात परब्रह्म परमात्मा आणि गाईगोपाळ यांचा सहसंबंध प्रामुख्याने दिसतो. त्याचा सरळ अर्थ घेतला तर नऊ लक्ष गाईंचा मालक भगवान आहे. या मालकाच्या गाई गोपालकांनी राखणीवर न्यायच्या. gopalkala-shrikrishna दिवसभर नेमून दिलेल्या जागेत चारायच्या. चारताना त्या इतरांच्या रानात जाणार नाहीत, याची काळजी घ्यायची. सायंकाळी गाई मालकाच्या घरी आणून गोठ्यात योग्य खुंट्यावर बांधायच्या. दोहन करून दूध मालकाकडे द्यायचं आणि रिकाम्या हाताने स्वगृही परतायचं. या सर्व क्रियाकलापात श्रीभगवान गोपालकृष्ण गोपालांच्या समवेत सर्वांची शिदोरी एकत्रित करून तयार झालेली मिसळ म्हणजे काला. हा काला भगवंत सवंगड्यांसह दररोज माध्यान्हसमयी भक्षण करीत असत. gopalkala-shrikrishna हा झाला लौकिकार्थ ! आपला देह म्हणजे गोकुळ. त्यातील आत्मा हा परमात्मस्वरूप आणि तोच देहाचा मालक म्हणजे गोपालकृष्ण आहे. या देहरूपी गोकुळात आत्मा नावाच्या मालकाच्या दशइंद्रियरूपी गाई आहेत. या देहनगरातील या गाई जीव नावाचा गुराखी म्हणजे गोपालक आहे. संसार नावाच्या रानात हा जीव नावाचा गुराखी इंद्रियरूपी गाई चारण्यास नेतो.
 
 
gopalkala-shrikrishna या गाई संसार नावाच्या आपल्या रानात चारण्याचा तो गुराखी आटोकाट प्रयत्न करतो. गाई इतरत्र म्हणजे विषयरूपी रानात जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतो. आत्मानुभव परिपूर्ण झाला की इंद्रिय गाई मालकाच्या म्हणजे आत्म्याच्या घरी आणून योग्य त्या स्थितप्रज्ञ खुंट्यावर बांधल्या जातात. त्यानंतर निरपेक्ष ईश्वरसेवेची दुग्धधार काढून ती आत्माराम मालकाला समर्पित करायची. रिकाम्या हाताने घर गाठायचं आणि निवांत, शांत राहायचे. gopalkala-shrikrishna हा झाला काल्याचा गर्भितार्थ. काला करताना भगवान स्वयं गाई गोपालांसोबत यमुना तीरी वावरतात. ते क्रीडा करतात, खेळतात, गंमत-जंमत करीत एकत्रित येऊन काला करतात. स्वतःच्या हाताने वितरित करतात. असे सद्भाग्य इतरांना नाही त्यासाठी गोपाल वृत्तीने राहावे लागते. ‘काला हा दुर्लभ आहे. काल्याच्या प्रसंगी चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी' असं प्रमाण आहे. श्रीकृष्ण परमात्मा पूर्णावतार आहेत. gopalkala-shrikrishna इतर अवतारात सद्गुरूंनी सांगावं आणि भगवंतांनी ऐकावं, पण गोपालकृष्ण अवतारामध्ये भगवान स्वतंत्र आहेत. ‘कृष्णं वंदे जगद्गुरूम्' म्हणून ते स्वतःच ठरवतात आणि तसेच वागतात. भगवान कृष्ण सामर्थ्य आणि स्वातंत्र्याने परिपूर्ण म्हणून त्यांचे गुणगान परिपूर्णतेचे द्योतक असलेल्या काल्याप्रसंगी केले जाते.
 
 
गोपालकालाप्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात केलेल्या बाललीला स्मरण करण्याचाच आग्रह आहे. काल्याच्या लीला अपरंपार आहेत. काला कुणालाही भेटत नाही. त्यासाठी संचित, सत्कर्म आणि सत्कृपा लागते. काला खाल्ल्याने खाणारा परब्रह्म स्वरूपास पात्र ठरतो. काल्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी काला दुपारीच असतो. gopalkala-shrikrishna कारण भगवंताने यमुना तीरी काला माध्यान्ह समयीच केलेला आहे म्हणून वारकरी संप्रदायाने काला दुपारीच करण्याचा प्रघात ठेवला आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतंत्र असले, तरी गोपालकाला करताना ते भक्तीच्या प्रांगणात परतंत्र आहेत. म्हणूनच जगाच्या पोटाची चिंता करणारा भगवंत इथे गोपाळांची उष्टावळ खातो. जगाला खेळवणारा, जगाचा खेळ चालवणारा, जगाचा डाव डाव करणारा विश्वाचा नियंता काल्याप्रसंगी स्वतः गोपाळांचा डाव देतो. gopalkala-shrikrishna असं का वागावं भगवंतांनी. कारण गोपाळ हे केवळ भक्तिरसात मग्न आहेत. विशुद्ध भक्तिप्रेमाशिवाय त्यांना काहीच सुचत नाही म्हणून तर देव परतंत्र ! ‘धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर!' हे करण्याचा अधिकार फक्त भक्तांचाच !
 
 
गोपाळ हे भगवंतांचे सखा आणि सोबती आहेत म्हणून त्यांना विशेषाधिकार आहे. काल्याचा एखादा तरी कण मिळावा म्हणून स्वर्गीचे अमर मृत्युलोकांत जन्म व्हावा अशी मनोकामना करतात. यमुना तीरी विविध वेशात आणि रूपात येतात. गोपाल यमुनेत हात धुतील तेव्हा त्यांच्या हाताचे चिकटलेले कण तरी खायला मिळतील म्हणून यमुनेतील मासे, जलचर बनून देव तयार राहतात. हे काल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. gopalkala-shrikrishna वारकरी संप्रदायात काला उपासना आणि साधनेची परिपूर्णता मानली जाते. म्हणूनच जगद्गुरू तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितले...
याल तरी यारे लागे। अवघे माझ्या मागे मागे। आजी देतो पोटभरी। पुरे म्हणाल तोवरी।
हळू हळू चला। कोणी कोणशीच न बोला। तुका म्हणे सांडा घाटे। तेणे नका भरू पोटे।। gopalkala-shrikrishna
संसारातील शिळ्या तुकड्यांवर म्हणजे घाट्यावर पोट भरण्यापेक्षा काल्याचे अनुभव अमृत जीवनाचे सार्थक करणार हेच काल्याचे महत्त्व आहे. काला सेवनाने जीवनाची परिपूर्णता प्रकट करताना काल्याचे ऐहिक आणि पारलौकिक महत्त्व संतांनी अनेक अभंगांतून विशद केले आहे. काला हा भक्तिप्रेम साधनेचा कळस आहे, हे वेगळे सांगणे नको.gopalkala-shrikrishna
९८२२२६२७३५