मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी आरोग्याची काळजी घ्या

07 Dec 2023 19:29:59
नागपूर, 
Nagpur Vidhan Bhavan : गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण आणि थंडीमुळे खोकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या जवळपास 100 कर्मचारी व अधिकार्‍यांना सर्दी-खोकला त्रास सुरु झाल्याने विधीमंडळातील आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या प्रवेश मार्गाच्या शेजारी मनपाच्या वतीने डॉक्टरांसोबत औषधोपचाराची सोय केली आहे. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत Nagpur Vidhan Bhavan विधानभवनातील आरोग्य केंद्रात जावून अनेकांनी औषधोपचार करुन घेतला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
 
Nagpur Vidhan Bhavan
 
मुख्यत: मंत्रालयातील कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते Nagpur Vidhan Bhavan विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी आले आहे. बुधवारपासूनच सर्दी-खोकल्याचा सुरु झाल्याने गुरुवारी विधानभवनात आल्यानंतर पुन्हा त्रास वाढल्याने औषधोपचार करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांचा समावेश होता.
 
 
अनेकांचे आरोग्य बिघडले
हिवाळी अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने कर्मचारी - अधिकारी नागपुरात आले आहे. हिवाळयात पावसाने हजेरी लावल्याने अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. यात अनेकांनी खाजगी रुग्णालात जावून उपचार करुन घेतले आहे. तर काहींनी Nagpur Vidhan Bhavan विधानभवनातील आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. सकाळपासूनच सर्दी-खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा विधानभवनातील आरोग्य केंद्रात जावून औषधोपचार करण्यास सर्वांनी प्राधान्य दिले. यात प्रामुख्याने सर्वाधिक मंत्रालयातील कर्मचार्‍यांचा समावेश होता. अवकाळी पावसाने नागपूरचे वातावरण पूर्णत: थंडगार झाल्याने अनेकांना थंडीचा त्रास सुरू झाला आहे.
 
 
यातही प्रामुख्याने दमा, उच्चरक्तदाब, शुगर, सर्दी-खोकला, हातपाय दुखणे, डोकेदुखी, कंबरदुखीचे रुग्ण औषधीसाठी आल्याची माहिती आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनादरम्यान ढगाळ वातावरण कायम राहिल्यास सर्दी, खोकला व संसर्गाचा त्रास होवू शकते. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन Nagpur Vidhan Bhavan विधीमंडळातील डॉक्टरांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0