बिरसीवरुन मुंबईकरिता थेट विमान सुरु होणार

08 Dec 2023 19:49:02
नागपूर, 
MP Praful Patel : बिरसी विमानतळावरुन आता विमान वाहतूक सुरु झाल्याने इतर विकास कामे वेगाने केल्या जात आहे. आगामी काळात येथून मुंबईकरिता थेट विमान सुरु होणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओच्या उद्घाटनानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. देशाअंतर्गत विमान वाहतूक व प्रवासी संख्या सतत वाढत असल्याने नव्या विमानतळाची गरज निर्माण होत आहे. राज्यातील अनेक जिल्हयात विमानतळ विकसित केल्या जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हवाई प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे. सध्याच्या घडीला देशाअंतर्गत 15 कोटी 50 लाख तर विदेशात 7 कोटी नागरिक हवाई प्रवास करीत आहे. भारतातील 10 टक्के नागरिक हवाई प्रवास करीत असल्याने नव्या विमानतळाची गरज वाढली आहे.
 
MP Praful Patel
 
नागपूरचे महत्व वाढणार
राज्यात लवकरच हवाई वाहतूक धोरण येणार असल्याने त्याचा लाभ हवाई वाहतूक क्षेत्राला होणार आहे. मिहानमध्ये हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्ती व तपासणीसाठी एमआरओची सुरुवात झाल्याने नागपूरचे महत्व वाढणार आहे. हवाई वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठीच केंद्र सरकार नव्या विमानतळाची संख्या वाढवित आहे. वस्तू व सेवा कर हा 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याने अनेक कंपन्या एमआरओ केंद्र सुरू करीत असल्याचे पटेल MP Praful Patel यांनी सांगितले.
 
 
जुने सहकारी एकमेकांना भेटतात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यावर आम्ही त्यांना भेटलो होतो. ते आमदार असल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे आमचे कर्तव्य होते. विधानभवनात ते आल्यावर अनेकजण त्यांना भेटले. तसे ही जुने सहकारी एकमेकांना भेटतात बोलतात, हे सर्व स्वाभाविक आहे, असे स्पष्ट मत प्रफुल्ल पटेल MP Praful Patel यांनी मांडले.
Powered By Sangraha 9.0