नवी दिल्ली :
wildlife दक्षिण आशिया भू भागात लुप्त होत असलेल्या वन्यजीवांची wildlife तस्करी रोखण्यासाठी भारत अन्य तीन देशांसोबत संयुक्त मोहीम राबवीत आहे. या संदर्भात चारही देशांच्या अधिकाऱ्यांनी भारतात आयोजित प्रशिक्षणात सहभाग घेतला.
wildlife वृत्तसंस्थांनुसार, भारत, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश या चार देशांनी दक्षिण आशिया क्षेत्रात लुप्त वा दुर्मिळ होत असलेल्या वन्यजीवांची तस्करी रोखण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. वन विभाग, सीमा शुल्क, पोलिस आणि निम लष्करी दलातील एकूण ३४ अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला.