अनिल कपूरचा नायक-2 लवकरच येणार...

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
मुंबई,  
Anil Kapoor Nayak-2 2001 मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता अनिल कपूरचा ‘नायक’ हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. यासोबतच परेश रावल, अमरीश पुरी यांच्याही यात जबरदस्त भूमिका होत्या. एका दिवसाचा मुख्यमंत्री राज्यात कसा बदल घडवून आणतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अनिल कुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
 
Anil Kapoor Nayak-2
 
शंकर दिग्दर्शित नायक या चित्रपटाची त्यावेळी प्रचंड क्रेझ होती. दरम्यान, एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूरने 'नायक'चा सिक्वेल बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता खुद्द अनिल कपूरने नायकच्या सिक्वेलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर एका चाहत्याला उत्तर देताना अनिल कपूरने 'नायक-2' लवकरच येणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच अनिल कपूरने इंस्टाग्रामवर बॉबी देओलसोबतची एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये बॉबी आणि अनिल दोघेही शर्टलेस दिसत आहेत. Anil Kapoor Nayak-2 या वयातही अनिल कपूरच्या फिटनेसचे लोकांनी कौतुक केले आहे. या पोस्टखाली एका चाहत्याने अनिलला 'नायक-2' करण्याची मागणी केली. त्या चाहत्याला उत्तर देताना अनिल कपूरने लिहिले की, 'त्याचा सीक्वल लवकरच बनवला जात आहे.'
अनिल कपूरच्या या कमेंटनंतर सध्या सोशल मीडियावर 'नायक-2'ची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा सिक्वेल पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या नव्या एपिसोडमध्ये कथा कशी असेल हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. अनिल कपूरने नुकताच रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटात काम केले. लोकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच या चित्रपटात बॉबी देओलनेही अनिल कपूरसोबत जबरदस्त कमबॅक केले आहे. 'नायक-2'बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी अनिल कपूरच्या एका कमेंटवर आधारित, प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.