राज्यात लवकरच एव्हिएशन पॉलिसी

08 Dec 2023 17:10:10
नागपूर,
Devendra Fadnavis : मध्यवर्ती नागपूरसह देशभरात विमानचालन (एव्हीएशन) हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. एव्हीएशन क्षेत्राचा वाढता व्याप लक्षात घेता त्याचा लाभ आपल्या राज्याला निश्चितच झाला पाहिजेत यासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी तयार केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओच्या उद्घाटन प्रसंगी केले.
 
Devendra Fadnavis
 
यावेळीDevendra Fadnavis  प्रामुख्याने खासदार प्रफुल पटेल, एअरबस हेलीकॉप्टर्सच्या ग्राहक सहाय्य व सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप आणि इंडामेर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय पटेल, एअरबस भारत व दक्षिण आशियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड, एअरबस भारत व दक्षिण आशियाच्या हेलीकॉप्टर विभागाचे प्रमुख सनी गुगलानी उपस्थित होते.
 
 
हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू होणार
मुख्यत: नागपूरच्या मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओचे उद्घाटन झाल्याने येत्या काळात हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू होणार आहे. नागपूर शहराच्या वाटचालीत हा महत्त्वाचा टप्पा आपण गाठला असून एमआरओमुळे हेलिकॉप्टरची मोठी इकोसिस्टीम तयार झाली आहे. हेलिकॉप्टरचा उपयोग सर्वच ठिकाणी वाढत आहे. यात प्रामुख्याने वैद्यकीय सेवा, पर्यटन, कायदा सुव्यवस्था आदी ठिकाणी हेलिकॉप्टरचा उपयोग प्राधान्य क्रमाने होत आहे. महाराष्ट्राच्या एव्हिएशन पॉलिसीमध्ये सर्व बाबींचा समावेश करण्यासाठी आतापासूनच कामास सुरुवात करण्यात येत असल्याचे फडणवीस Devendra Fadnavis यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0