तभा वृत्तसेवा
अल्लीपूर,
Crop sowing : परिसरात सोयाबीन पिकानंतर शेतकर्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा पेरणी केली असुन पीक 15 दिवसांचे होताच पावसाने वातावरण बदल झाल्याने बुरशी रोग वाढल्याने पीक मरू लागल्याने धास्ती पोटी येथील शेतकर्यांनी मोड तेथेच दुबार हरभरा पेरणी केली.
आधीच सोयाबीन गेले आता हरभरा पीक गेले आता शेतकरी नाकीनऊ आला आहे. Crop sowing सोनपेठ शिवारात पांडुरंग लिचडे, विठ्ठल झिलपे, सुरेश हटवार यांनी पीक मोड केली आहे. अल्लीपूर, एकुली, अलमडोह, पवनी येथे मोठ्या प्रमाणावर रोग आला आहे. निसर्ग यावर्षी शेतकर्यांवर चांगलाच कोपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सहा एकर शेतात हरभरा पीक पेरणी केली असून दोन एकर मोड केली आहे, असे शेतकरी पांडुरंग लिचडे यांनी सांगितले. दोन एकर हरभरा पिकाची मोड करून दुबार Crop sowing पेरणी केल्याचे शेतकरी यशवंत झिलपे यांनी सांगितले. पंधरा दिवसांपासून पाणी व वातावरण बदल झाल्याने हरभरा पिकावर मर रोग वाढत आहे. उन्ह पडेपर्यंत रोगाचे प्रमाण राहील. बुरशी नाशक औषधे फवारणी करावी, असे कृषी सहाय्यक पंकज चौधरी यांनी आवाहन केले आहे.