वेस्ट हॅमची जोरदार मुसंडी, टोटेनहॅमवर विजय

08 Dec 2023 22:36:47
लंडन, 
इंग्लिश Premier League प्रीमियर लीग फटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात पिछाडीवर राहिलेल्या वेस्ट हॅमने जोरदार मुसंडी मारत बलाढ्य टोटेनहॅम हॉटस्परवर २-१ अशा गोलफरकाने रोमांचक विजय नोंदविला. Premier League सामन्याच्या शेवटी वेस्ट हॅमच्याखेळाडूंनी आपल्या चाहत्यांसह आनंद साजरा केला.
 
 
Premier League
 
Premier League सामन्याच्या प्रारंभी ११व्या मिनिटाला क्रिस्टियन रोमेरोने हेडरव्दारे गोल नोंदवून टोटेनहॅम हॉटस्परला आघाडी मिळवून दिली, परंतु जेरॉड बोवेनने ५२ व्या मिनिटाला गोल नोंदवून आपल्या वेस्ट हॅमला सामन्यात बरोबरीवर आणले. जेम्स वॉर्ड-प्रोसने ७४ व्या मिनिटाला परत आलेल्या चेंडूवर पुन्हा ताबा घेत गोल नोंदविला आणि वेस्ट हॅमच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. वेस्ट हॅमने शेवटच्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकून आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला आहे. त्याच वेळी, टोटेनहॅम हॉटस्पर्सला पाच सामन्यांमध्ये चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी सलग पाच गेममध्ये आघाडी घेतल्यानंतर सामन्यावरील आपली पकड सोडली. या सामन्यादरम्यान टोटेनहॅमच्या ह्युंग-मिनने कसोशीने प्रयत्न केले, परंतु वेस्ट हॅमच्या संरक्षण फळीने त्याची डावळ शिजू दिली नाही. तसेच वेस्ट हॅमचा गोलरक्षक लुकाझ फॅबियनस्कीनेही आपली जबाबदारी चोखपणे बजावत टोटेनहॅमच्या ब्रायन गिलच्या गोलचा बचाव केला.
Powered By Sangraha 9.0