ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडला तारले

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
मीरपूर, 
Glenn Phillips येथे सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ग्लेन फिलिप्सने Glenn Phillips अर्धशतक झळकावून न्यूझीलंडला तारले. बांगलादेशच्या १७२ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १८० धावा फटकावून पहिल्या डावात ८ धावांची निसटती आघाडी मिळविली. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात ८ षटकांत २ बाद ३८ धावा केल्या.
 
 
Glenn Phillips
 
सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या १७२ धावांना प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची ५ बाद ५५ धावा अशी दयनीय अवस्था झाली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा दुसरा दिवस वाया गेला. आज ५ बाद ५५ धावांवरून न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावास पुढे सुरुवात केली. डॅरिल मिचेल (१८) व ग्लेन फिलिप्सने सहाव्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली व संघाला ९५ धावांचा टप्पा गाठून दिला. पुढे Glenn Phillips ग्लेन फिलिप्सने काईल जेमिसन (२०) व टिम साऊदीच्या (१४) साथीने संघाला १८० धावांचा टप्पा गाठून दिला. फिलिप्सने ७२ चेंडूंत ९ चौकार व ४ षट्कारांसह ८७ धावांची खेळी केली. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात ६ षटकांत २ ब ाद ३९ धावा नोंदविल्या. बांगलादेश सध्या ३० धावांनी आघाडीवर आहे.