हलाल प्रमाणपत्र : सरकारच्या सार्वभौमत्वाला आव्हान

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
प्रहार
 
Halal Certification : उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातली आहे. राज्यात तेल, साबण, टूथपेस्ट यासारख्या हलाल प्रमाणित शाकाहारी उत्पादनांच्या विक्रीची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकार्‍यांना कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. अनेकांचा पहिला प्रश्न हा आहे की या प्रमाणपत्राची काही गरज होती काय? आणि जर हे प्रमाणपत्र इतके अनिवार्य असेल तर पुढे काय केले पाहिजे? या बातमीची आणि त्याच्या विश्लेषणाची सुरुवात प्रस्तावना-रूपरेखेने न करता थेट निष्कर्षातून केली जाऊ शकते आणि हा निष्कर्ष म्हणजेच सर्व राज्य सरकारांनी हलाल प्रमाणपत्रावर सरसकट बंदी घातली पाहिजे. सर्वांनी हलाल उत्पादनांवर, हलाल भोजन देणारे रेस्टॉरंट्स आणि हलाल उत्पादनांचा साठा करणार्‍या दुकानांवर बहिष्कार घातला पाहिजे. हे सांगण्याचे विशेष कारण असे आहे की ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात हे आपल्याला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. परंतु या अटी अशा प्रकारे ठेवल्या गेल्या आहेत की जे त्याकडे काळजीपूर्वक, अवधानपूर्वक पाहत नाहीत त्यांना त्यामागची मेख कळू शकत नाही. उदाहरणार्थ, ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी जाणून घेण्यासाठी आपण गुगलवर सीएसी/जीएल24-1997 असे टाईप करा. आपल्याला तेथे ‘हलाल’ ची व्याख्या मिळेल. या व्या‘येनुसार, हलाल अन्न (फूड) म्हणजे असे अन्न, ज्याला इस्लामिक कायद्यानुसार परवानगी आहे आणि जो खालील अटींचे पालन करतो-

Halal Certification
 
* तथाकथित हलाल अन्नात असे काहीही नसावे, जे इस्लामिक कायद्यानुसार बेकायदेशीर मानले जाते
* हे अन्न कोणते असे उपकरण किंवा सुविधेचा वापर करून तयार, प्रक्रिया केलेले, वाहतूक किंवा संग‘हित केलेले नसावे जे इस्लामिक कायद्यानुसार कोणत्याही गैर-हलाल वस्तूपासून मुक्त असेल.
* निर्मिती, प्रक्रिया, वाहतूक किंवा साठवण दरम्यान हे अन्न अशा कोणत्याही अन्नाच्या थेट संपर्कात आले नसावे जे हलाल नाही आणि वरील दोन्ही अटी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरेल.
 
हलाल, हराम आणि गैर-हलालमधील फरक
आपण विचारात घ्या की, मूळ अट अशी आहे की ते अन्न इस्लामिक कायद्यानुसार बनलेले असावे. ते तयार करण्यापासून अर्थात प्रक्रिया, वाहतूक करणे आणि साठा करून ठेवणे हे सारे इस्लामिक कायद्यानुसार व्हावे, अशी मुख्य अट आहे. येथे मूलभूत प्रश्न म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार हलाल म्हणजे नेमके काय? सगळ्यात आधी मांस विषयी चर्चा करूया. गूगलवर सर्च केले असता असे आढळले की, इस्लाममध्ये भोजनात वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट Halal Certification हलाल, हराम किंवा गैर-हलाल आहे. गैर हलाल खाद्य पदार्थांमध्ये मद्य आणि इतर मादक पदार्थ, इस्लामिक पद्धतीने कत्तल न केलेला कोणताही प्राणी (मासे आणि सागरी प्राणी वगळता), रक्त, डुकराचे मांस, कुणा देवतेच्या मूर्तीसमोर बळी दिल्यानंतर तयार केलेले (अल्ला वगळता दुसर्‍या एखाद्याच्या नावाने कत्तल केलेले), दात असलेले सर्व मांसाहारी प्राणी जसे सिंह आणि वाघ, पंख असलेले सर्व जीव ज्यांना पंजे असतात (शिकारी पक्षी, गरुड, गिधाड) आणि याप्रमाणेच पाळीव गाढव, उंदीर, विंचू, साप, बेडूक इत्यादी. हे सर्व गैर हलाल आहेत. अडकले आहेत. आता येथे असा प्रश्न उपस्थित होतो की भोजन आणि पेय पदार्थांबाबत हलालची काय अट आहे? अन्न किंवा कोणतेही पेय हलाल होण्यासाठी त्यात असे काहीही समाविष्ट केले जाऊ नये, जे शरिया कायद्यात हराम (निषिद्ध) मानले जाते. हे अन्न किंवा पेय कोणत्याही हराम गोष्टीद्वारे तयार, संसाधित (प्रक्रिया) किंवा दूषित नसावे. कोणत्याही हराम अर्थात निषिद्ध वस्तूपासून दूषित सुविधेचा वापर करून वाहतूक किंवा साठा (स्टोअरेज) केलेले नसावे.
 
 
सर्वांत महत्त्वाचा व मूलभूत प्रश्न अद्याप शिल्लक आहे. इस्लामिक कायदा म्हणजे काय? इस्लामिक कायदा म्हणजे शरिया किंवा शरीयत. म्हणजेच, Halal Certification हलाल अन्नावर अशीच मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील, जी शरियाच्या दृष्टीने बाबतीत योग्य आहेत. त्यानंतर एखादी संस्था त्याच्या हलाल प्रमाणीकरणाला औपचारिक प्रमाणपत्र देते की अन्न उत्पादन, त्याची सामग्री आणि त्याच्या निर्मितीत गुंतलेली प्रकि‘या इस्लामिक कायद्यांचे पालन करते. जनावरांची कत्तल करण्याची प्रक्रिया, ज्याला ‘जिबह’ म्हणतात, यामध्ये प्राण्यांच्या ‘रक्तस्त्राव’ वर विशेष भर आहे. रक्त ‘अपवित्र’ असते अशी इस्लामची मान्यता आहे. त्यामुळे ‘जिबह’ करण्यात आलेल्या प्राण्यांमधून वाहणारे रक्त हा हलाल प्रक्रियेचा मुख्य आधार आहे. रक्ताचे सेवन कोणत्याही किमतीत टाळले पाहिजे, असे कुराणात बर्‍याच ठिकाणी नमूद केले आहे. इस्लाममध्ये रक्ताला हराम मानले जाते. तसेच कलमा न वाचताच जनावरांची कत्तल करण्याची प्रक्रिया अर्थात ‘जिबह’ केले असेल तर ते पुन्हा हराम आणि गैर-इस्लामी होते.
 
 
आता, जरा मांसविषयी. प्रमाणित Halal Certification हलाल मांस तेच असू शकते, ज्याच्या प्रकि‘येतील प्रत्येक टप्प्यावर केवळ मुस्लिमांची नेमणूक केली जाते. मग त्या प्राण्याची किंवा पक्ष्याची कत्तल करणे असो किंवा त्याचे मांस शिजविणे असो. प्रत्येक टप्प्यावर केवळ मुस्लिम व्यक्तीच असावी. इस्लामिक (शरिया) कायद्यात यासंदर्भात अतिशय बारकाईने सांगितले आहे. यात म्हटले आहे की कुठल्याही जनावर, प्राण्याला ‘हलाल’ करण्यासाठी धारदार चाकू वापरला पाहिजे, चाकू प्राण्यांच्या मानेपेक्षा 2 ते 4 पट मोठा असावा आणि त्या प्राण्याला ‘सावकाशपणे’ (आरामात) मरू दिले पाहिजे. अन्न/खाद्य हलाल करण्यासाठी मुल्लाने कलमा वाचण्याची आणि पॅकिंग करण्यापूर्वी त्यावर थुंकण्याची देखील गरज मानली जाते. मग भलेही ती वस्तू मुगाची डाळ असो किंवा हेयर क‘ीम, जर ते हलाल प्रमाणित असेल तर सगळे या पद्धतीनेच झाले पाहिजे.
 
 
दोन वर्षांपूर्वी एस. जे. आर. कुमार नामक एका व्यक्तीने केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सांगितले की, मुस्लिम समुदायाच्या विद्वानांनी जाहीरपणे घोषित केले आहे की हलालला प्रमाणित करण्यासाठी संबंधित खाद्यपदार्थांत लाळ (स्पिट) मिसळणे हा एक आवश्यक घटक आहे. मुस्लिम विद्वानांनी आपला पवित्र ग्रंथ आणि त्यातील वैध व्याख्या यावर आधारित आपले मत दिले आहे. तथापि, एका वर्गाकडून भिन्न विचार देखील व्यक्त करण्यात आला आहे. अन्नपदार्थांना हलाल Halal Certification म्हणून प्रमाणित करण्यासाठी त्यावर थुंकण्यासंदर्भात अलिकडील वाद आणि धार्मिक विद्वानांच्या प्रतिक्रियांच्या पृष्ठभूमीवर, मोठ्या प्रमाणात असलेला गैरमुस्लिम समाज हलाल प्रमाणित खाद्यपदार्थांच्या घरगुती वापराबद्दल फारच चिंतिंत आणि अस्वस्थ आहे. (हलाल) प्रमाणपत्रासह निर्मित खाद्यसामुग्रीचा वापर हिंदू मंदिरांमध्ये नैवेद्यम (प्रसाद) बनवण्यासाठी केला जातो, हे अत्यंत निराशाजनक तसेच अस्वस्थ व संतप्त करणारे आहे. कारण हिंदूंचे धार्मिक विधी, अनुष्ठान आणि रीति-रिवाज भिन्न आहेत.
 
 
वस्तुस्थिती ही आहे की, हलाल मांस उद्योग गैर-मुस्लिमांबाबत भेदभाव करतो आणि शेवटी हलाल प्रकि‘येच्या धार्मिक गरजा टिकवून ठेवण्याच्या नावाखाली नोकरी आणि रोजगारापासून गैर-मुसलमानांना वंचित ठेवतो. केवळ मांसाहारी पदार्थांसाठीच नव्हे तर शाकाहारी पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, मसाले आणि इतर एफएमसीजी वस्तू यासारख्या उत्पादनांसाठी देखील हलाल प्रमाणपत्र आहे. बर्‍याच कंपन्या, इस्लामिस्ट आणि हलाल समर्थक वारंवार हीच बाब सांगतात. ‘अल तकिया’ अंतर्गत फसवणूक करण्यासाठी व संभ्रम निर्माण करण्यासाठी एक वर्ग निश्चितपणे समोर आला आहे. त्यांचा असा दावा आहे की हलाल प्रमाणीकरण केवळ ‘शुद्धता आणि Halal Certification प्रामाणिकपणा’ चा निकष आहे. उत्पादन ‘चांगले’ आहे असा ‘हलाल ऑथेंटिकेशन’ (गैर-मांस उत्पादनांवर) चा अर्थ होतो. पण यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हलाल प्रमाणपत्र का आवश्यक आहे? यामागचे नेमके औचित्य काय आहे?
 
 
प्रदीर्घ संघर्षानंतर हलाल संसदेत बंद
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरदार रविरंजन सिंग हलालविरुद्ध जवळजवळ दीड दशकापासून आंदोलन करीत आहेत. त्यांनी 2014 मध्ये ‘झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी’ची स्थापन केली. याद्वारे ते संपूर्ण देशात हलाल अर्थव्यवस्थेविरुद्ध लोकांना जागरूक करतात. हलाल प्रमाणपत्राच्या वस्तूंमुळे देशाला कोणत्या प्रकारचा धोका आहे, हे ते आपल्या मोहिमेतून सांगतात. 2007 मध्ये त्यांनी संसदेच्या कॅन्टीनमध्ये हलाल मांस देण्याच्या विरोधात संघर्ष सुरू केला. या प्रदीर्घ संघर्षाला यश येऊन अखेर 2021 पासून संसदेच्या कॅन्टीनमध्ये हलाल प्रमाणित मांस देणे बंद झाले आहे.
 
मुस्लिमांनी केली बंदीची मागणी
उत्तर प्रदेशातील अनेक मुस्लिम व्यापा .्यांनी राज्य सरकारने Halal Certification हलाल उत्पादनांवर लादलेल्या बंदीला पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणतात की काही संस्था किंवा लोक हलालच्या नावावर फसवणूक करीत आहेत. म्हणूनच, हलालला केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात बंदी घातली पाहिजे.
 
 
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातली आहे. Halal Certification हलाल प्रमाणपत्र ही केवळ राज्य सरकारच्या सामर्थ्याला, सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आणि जबरदस्तीने वसुली करणारी एक प्रणाली नाही तर ती अन्य लोकांवर धर्म लादण्याचेही कार्य करते.
इराणचा फॉर्मुला...
इराणमध्ये 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर तेथील सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी गैर मुस्लिम देशातून अन्न, विशेष करून मांस आयात करण्यावर बंदी घातली. या बंदीमुळे जेव्हा इराणच्या बाजारात अन्नाची कमतरता भासू लागली तेव्हा अयातुल्ला खोमेनी यांना आपल्या निर्णयावर पुनर्विचार करणे भाग पडले. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी नवीन फॉॅर्मुला काढला. जर इराणला पाश्चिमात्य देशांकडून पुन्हा मांस आयात करण्याची वेळ आली तर आम्ही प्राण्यांच्या कत्तलीच्या प्रक्रियेच्या ‘इस्लामीकरणा’ वर भर देऊ, असे इराणने स्पष्टपणे सांगितले. अर्थात हलाल फूड इंडस्ट्रीसाठी प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले असले तरी त्यापूर्वी त्यांना कधीही धार्मिक नेत्यांनी अधिकृत केले नव्हते. पण, इराणच्या कट्टरवादी नेत्यांनी याची सुरुवात केली.
हलालचे अर्थशास्त्र
हलालच्या मागे संपूर्ण अर्थशास्त्र आहे. सर्वांत सहजपणे, स्पष्टपणे दिसून येते ते प्रमाणपत्र आणि त्याची किंमत. परंतु जर आपण त्याची पृष्ठभूमी तपासली तर रोजगार, जिहाद आणि हिंदू-शीख समुदायाच्या धार्मिक भावनांवर आघात करणे हा त्याचा अंतर्निहित भाग आहे, हे लक्षात येते. त्याच वेळी, समांतर अर्थव्यवस्थेचा पैलू देखील याला आहे. समांतर महसूल निर्मिती आणि महसुलाचा वापर देशविरोधी चळवळ, Halal Certification दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी आणि प्रेस्टीट्यूट मीडिया खरेदी करण्यासाठी करणे यात आश्चर्यकारक असे काही नाही. जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये असे लिहिले असते की ‘ येथील सर्व नॉन-व्हेज हलाल प्रमाणित आहे’ याचा अर्थ असा आहे की संबंधित रेस्टॉरंट कोणत्याही हिंदू कसायाकडून मांस खरेदी करीत नाही. अशा प्रकारे हलाल प्रकार हा हिंदूंवर एक प्रणालीगत बहिष्कार आहे.
सरकारला आव्हान
हलाल नेटवर्क अधिकाधिक खोलवर वाढत आहे आणि नियंत्रित न होण्याच्या स्थितीत पोहोचत आहे. सर्वांत पहिला मुद्दा म्हणजे देशातील वैधानिक सरकारच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान. सरकार, त्याच्या संस्था, कायद्याची भूमिका व वर्चस्व आम्ही नाकारू शकतो, असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेश हलाल नेटवर्कने दिला आहे. दुसरा मुद्दा रोजगाराचा आहे. तिसरा मुद्दा खर्चाच्या पातळीवर स्पर्धात्मकता सुनिश्चित करण्यासाठी अखंडित पुरवठा साखळी तयार करण्यासाठी दीर्घकालीन योजना आखण्यासंदर्भात आहे. हलाल नेटवर्कने ही पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात आपल्या ताब्यात घेतली आहे.
फसवणुकीचा व्यवसाय
हलालचा व्यवसाय फसवणुकीशी देखील संबंधित आहे. Halal Certification हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्था त्यांचे पैसे कोठे खर्च करतात हा आणखी एक वेगळा प्रश्न आहे. इस्लामिक बँकिंग आणि हलाल इन्व्हेस्टमेंट कंपनी आयएमएची स्थापना 2006 मध्ये कर्नाटकच्या बंगळुरू येथे मन्सूर खान याने केली होती. मन्सूर खानने दरमहा 14 टक्के ते 18 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तो भारतातून पळून गेला. त्याने सुमारे 2,800 कोटी रुपयांची लूट केली. 23, 000 हून अधिक लोक या इस्लामिक बँकिंग फसवणुकीचे बळी ठरले आहेत.