अभूतपूर्व...ऐतिहासिक हॅट्ट्रिकमुळे 2024 च्या विजयाची ‘गॅरंटी’
08 Dec 2023 10:00:00
वर्तमान
BJP Victory : काँग्रेसकडून राजस्थान व छत्तीसगड ही दोन राज्ये खेचून घेत व स्वत:कडील मध्यप्रदेश कायम राखत भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यश मिळवले आहे. छत्तीसगडबाबत तर भल्या भल्या पोलपंडितांचा अंदाज साफ चुकवत भाजपाने तेथे जबरदस्त मुसंडी मारत काँग्रेसला जबर तडाखा दिला. तर मध्यप्रदेशात कमळाच्या जबरदस्त लाटेत काँग्रेसची नौका बुडाली. तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली असली तरी भाजपाचे कारारेड्डी मतदारसंघातील उमेदवार कटिपल्ली वेंकटरमण रेड्डी हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी एकाच वेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अनुमुला रेवंत रेड्डी यांचा सणसणीत पराभव केला. तर मिझोरम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटचा (एमएनएफ) पराभव करीत झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) सत्ता हस्तगत केली आहे. भाजपाने तीनही हिंदी भाषक राज्यातून काँग्रेसला हद्दपार करून आपले सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध केले. महिला, नवमतदार युवक-युवती व वनवासी बांधव यांचे BJP Victory भाजपाच्या विजयात मोठे योगदान आहे. या तीन राज्यातील अभूतपूर्व आणि दणदणीत विजयामुळे 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकणारच असा प्रबळ आत्मविश्वास पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात उत्पन्न झाला आहे.
पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाल्यावर पंतप्रधानांचे भाजपा कर्याकर्त्यांनी दणदणीत स्वागत केले. जनतेच्या आशीर्वादामुळेच तिन्ही राज्यात हा अभूतपूर्व विजय मिळाला आहे व विजयाची ही हॅट्ट्रिक 2024 च्या लोकसभा निवडणुकीची हॅट्ट्रिक ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हा विजय म्हणजे भ्रष्टाचार, जातिवाद आणि घराणेशाहीला कठोर संदेश असल्याचे पंतप्रधानांनी रोखठोकपणे बजावले. जनता आता त्यांच्याप्रती ‘झीरो टॉलरन्स’चे धोरण स्वीकारत आहे. या तीन वाईट गोष्टींविरुद्ध लढा देण्यासाठी भाजपा हा एकमेव पर्याय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करणार्यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.
‘कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक सावध राहावे लागेल. BJP Victory देशाचे विभाजन करण्याचा व देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार्या शक्ती आता आकाशपाताळ एक करतील. भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथन) चे उत्तर द्यावे लागेल. तसेच जनतेमध्ये पक्षाचा जनाधार मजबूत करावा लागेल, असे पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले. विजयाचा संदेश संपूर्ण जगात निनादेल. भारताची लोकशाही आणि लोक मजबूत असल्याचा हा गुंतवणूकदारांना स्पष्ट संदेश आहे. भारताचा विकास विश्वासार्ह आहे आणि लोक विचारपूर्वक स्थिर सरकार निवडतात. भाजपाचे राजकारण हे कामगिरी आणि विश्वासावर आधारित आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करणार्यांना जनता जबरदस्त धडा शिकवते, हा विरोधी आघाडीसाठी स्पष्ट संदेश आहे. देशद्रोही आणि फुटीरतावादी शक्तींना पाठिंबा देणार्यांना आम्ही निश्चितपणे पराभूत करू, असा स्पष्ट संदेश जनतेने दिला आहे.
मध्यप्रदेशात प्रचंड विजय
भाजपाचा BJP Victory सर्वांत प्रचंड विजय मध्य प्रदेशात झाला आहे. तेथे पक्षाने दोन तृतीयांश बहुमताचा आकडा पार केला आहे. 230 सदस्यांच्या सभागृहात भाजपाने 163 जागा जिंकल्या आहेत. हा विजय विशेष उल्लेखनीय आहे. कारण भाजपा मागील 20 वर्षांपैकी 18 वर्षे राज्यात सत्तेवर आहे. यातील बहुतांश कालावधीत शिवराजसिंह चौहान मु‘यमंत्री होते. चौहान यांना त्यांचे समर्थक प्रेमाने ‘मामाजी’ म्हणतात. ‘लाडली बहना’ सार‘या कल्याणकारी योजनांमुळे भाजपाने तथाकथित सत्ताविरोधी प्रवाह रोखून पुन्हा सरकार स्थापित करण्यात यश मिळविले.
दिग्गज नेते आणि नऊ वेळा खासदार राहिलेल्या कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेशात काँग्रेसने आपली प्रचार मोहीम राबविली होती. मात्र, काँग्रेसला 66 जागाच मिळाल्या. जितू पटवारींसह काँग्रेसचे काही बडे नेते या निवडणुकीत पराभूत झाले. BJP Victory भाजपाला 48.56 टक्के आणि काँग्रेसला 40.40 टक्के मते मिळाली. मार्च 2020 मध्ये सरकार पडण्यापूर्वी कमलनाथ जवळपास 15 महिने मुख्यमंत्री होते. त्याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे आपल्या निष्ठावान आमदारांसोबत भाजपामध्ये गेले. शिंदे यांनी निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. शिंदे यांच्या प्रभावामुळे भाजपाने ग्वाल्हेर-चंबळ भागात पक्षाने अनेक जागा जिंकल्या.
राजस्थानात काँग्रेसची संजीवनी निष्प्रभ
गेल्या काही महिन्यांत राजस्थानात काँग्रेसने चांगली लढत दिली. पण भाजपाचा विजय रोखण्यासाठी ती पुरेशी नव्हती. 200 सदस्यांच्या सभागृहात BJP Victory भाजपाने 115 जागा जिंकून सहज बहुमत मिळवले. राज्यात काँग्रेसने 69 जागा जिंकल्या. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राजस्थानात पुन्हा दुसर्यांदा कुठल्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलेले नाही. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. काँग्रेसने दिलेली हमी आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकारची महत्त्वाकांक्षी संजीवनी योजना राज्यातील सत्ताधारी पक्षाला विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही. भाजपाने मोठ्या प्रमाणात सामूहिक नेतृत्वाखाली आपले जबरदस्त प्रचार अभियान राबविले. अशोक गहलोत आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात विस्तव देखील जात नव्हता. या दोघांची भूतकाळातील भांडणे लोक विसरले नव्हते.
छत्तीसगडमध्ये चमत्कार
छत्तीसगडमध्ये BJP Victory भाजपाने काँग्रेसला धोबीपछाड देत 90 सदस्यांच्या सभागृहात 54 जागा जिंकून अक्षरश: चमत्कार घडविला. तेथे काँग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल, असेच भाकीत बहुतांश जनमत चाचण्यांनी वर्तविले होते. काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण छत्तीसगडच्या जनतेने काँग्रेसला अस्मान दाखविले. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची रणनीती आणि आश्वासने अपुरी ठरली.
तेलंगणाचा दिलासा
काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे तेलंगणा येथील विजय. तेथे भारत राष्ट्र समिती सरकारला हटविण्यासाठी पक्षाने आक्रमक मोहीम राबवली आणि राज्यात पक्षाने प्रथमच पूर्ण बहुमत प्राप्त केले. गेल्या 10 वर्षांपासून तेलंगणात बीआरएसची सत्ता होती. 119 सदस्यीय विधानसभेत काँग‘ेसने 64 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला. बीआरएसने 39 तर भाजपाने 8 जागा जिंकल्या.