एमकेसीएल देणार रोजगाराच्या संधी

अभ्यासक्रम आता नव्या स्वरूपात

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
MKCL employment : बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या करीर विषयी अपेक्षामध्ये बदल झाले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून (एमकेसीएल) आता रोजगाराच्या सर्वोतम संधीसाठी एमएस-सीआयटीसोबतच इंडस्ट्री उपयोगी व उत्तम संगणक ज्ञान देणारे विविध अभ्यासक्रम देखिल सुरू केले आहे. त्यांना ‘क्लिक कोर्सेस’ असे म्हणले जाते. रोजगाराच्या संधी देणारे अभ्यासक्रम विद्यार्थांनी करावे, असे आवाहन एमकेसीएलच्या प्रबंध संचालक वीणा कामत यांनी केले.
 
MKCL employment
 
नव्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांनी शुक्रवार 8 डिसेंबरला MKCL employment पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एमकेसीएलचे विभागीय समन्वयक देवेंद्र पाथरे, कुंदन रामटेके, जिल्हा समन्वयक जयंत लोहीकर उपस्थित होते. विना कामत म्हणाल्या, कौशल्य विकासामुळे बेरोजगारी कमी होऊ शकते. उत्पादकता वाढू शकते आणि जीवनमान सुधारू शकते. भविष्यातील नोकर्‍यांसाठी लोकांना अपस्किलिंग किंवा रिस्किलिंगमध्ये गुंतवणूक केल्याने आर्थिक अर्थ प्राप्त होतो. या प्रकारचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाची मार्कशीट दिल्या जाणार आहे.
 
 
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होणार्‍या आमूलाग्र बदल समोर ठेऊन येणार्‍या काळात शिक्षणात कौशल्य आणि कार्यबल विकास शिक्षणावर जास्तीत जास्त भर असणार आहे. राष्ट्रासमोर असणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनुष्यबळ हे सर्वात महत्वपूर्ण संसाधन आहे. नागरिकांना सक्षम बनवण्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. MKCL employment काळाची गरज म्हणून एमकेसीएल आता नवनवीन ‘क्लिक कोर्सेस’ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहेत. त्यात क्लिक इंग्लिश कम्युनिकेशन, क्लिक टॅली विथ जीएसटी, अ‍ॅडव्हान्स्ड टॅली, अ‍ॅडव्हान्स्ड एक्सेल, ऑटोकॅड, 3डी मॉडेलिंग, 3डी टेक्चरिंग अँड लायटिंग, डिटीपी-कोरेल, डिटीपी-अ‍ॅडोबे, फोटोशॉप, वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, कटेंट इलस्ट्रेटर, व्हिडीओ एडिटिंग, सी प्रोग्रॅमिग, सीसी++ प्रोग्रॅमिग, कंप्यूटर हार्डवेअर सपोर्ट, नेटवर्क सपोर्ट, सिक्युरिटी सपोर्ट, डेस्कटॉप सपोर्ट, स्कॅ च प्रोग्रेमिंग, क्लिक आयओटी इत्यादी कोर्सेसचा समावेश आहे. पुढील महिन्यापासून रोबीटिकर, सायबर सिक्युरिटी, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, रिटेल मॅनेजमेंट, बीएफएसआय या कोर्ससचे प्रशिक्षण देखील सुरू होणार आहे. वरीलपैकी कोणतेही तीन कोर्सेस एकत्र केल्यावर क्लिक डिप्लोमा असे अतिरीक्त प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रोफेशनल स्किल व रोजगार कौशल्य पुढील काळात युवापिढीसाठी महत्त्वाचे असणार आहे. युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन वीणा कामत यांनी केले.