स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणारे महाराष्ट्रद्रोही

काँग्रेसच्या निषेधार्थ भाजपचे निदर्शने

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
नागपूर,
BJP protests : स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणारे महाराष्ट्रद्रोही असून अशा नेत्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे, असे आशिष शेलार व प्रविण दटके यांनी शुक्रवारी विधानभवनाच्या पायरीवर काँग्रेसच्या विरोधात निदर्शने करताना सांगितले. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करत आहे. खरगे यांचे सुपूत्र प्रियांश यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता, या वक्तव्यावरून भाजपच्या आमदारांनी काँग्रेसच्या विरोधात निदर्शने केली.
 
BJP protests
 
स्वातंत्र्यावीरांचा अवमान केल्याने BJP protests भाजपच्या वतीने निदर्शने आंदोलनात टेकचंद सावरकर, राम कदम, समीर मेघे, बंटी भांगडिया, सुनील राणे,सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे आदी सहभागी झाले होते.