-शेतकर्यांकडून वसूल करणार
-मग शेतकरी प्रश्नांवर चर्चा का नाही
-विधानसभेत नाना पटोले यांचा संतप्त सवाल
दिनांक :08-Dec-2023
Total Views |
नागपूर,
Nana Patole : राज्यातील शेतकर्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. मात्र, राज्य सरकारची शेतकर्यांविषयी भूमिका वेळकाढूपणाची आहे. शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी अवयव विकण्याची परवानगी द्यावी म्हणून मंत्रालयात येत आहेत. आज आपण शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही, तर आणखी शेतकरी आत्महत्या करतील, त्याला आपण सर्व जबाबदार राहू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी आज विधानसभेत सांगितले.
शेतकर्यांना भरपूर दिले म्हणून सरकार सांगत आहे. परंतु, प्रत्यक्षात शेतकर्यांना काहीच मिळत नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा होऊ का देत नाही? सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा होणार नसेल तर आम्हाला चर्चेत रस नाही. राज्यावर 7 लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले, ते शेतकर्यांकडूनच वसूल करणार आहात ना, मग शेतकर्यांना पैसे देण्यास टाळाटाळ का, असा संतप्त सवाल नाना पटोले Nana Patole यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.