नानी आणि मृणाल ठाकूर यांच्या 'है नन्ना' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी खळबळ

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
हैद्राबाद :
Hai Nanna तेलुगु स्टार नानी आणि मृणाल ठाकूर यांच्या रोमँटिक चित्रपट, Hai Nanna हाय नन्नाला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. शौर्यव दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे आणि इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने गुरुवारी, रिलीजच्या दिवशी 6.10 कोटी रुपयांची कमाई केली.
 

hi nanna 
 
Hai Nanna हाय नन्ना सुरुवातीला 21 डिसेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार होते, तथापि, KGF फेम प्रशांत नील दिग्दर्शित प्रभासच्या एपिक अक्शन थ्रिलर चित्रपट सलारशी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी त्याची रिलीज तारीख 7 डिसेंबरपर्यंत पुढे आणली. या आठवड्यात इतर कोणतेही प्रमुख तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाले नसल्यामुळे हा निर्णय एक शहाणपणाचा निर्णय असल्याचे दिसून येत आहे आणि पुढील आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल.