तभा वृत्तसेवा
अमरावती,
Nari Shakti Mahila Samelan : महिला है तो परिवार है, सुंदर समाज का उपहार है, हा विचार घेऊन महिला समन्वयतर्फे रविवार 10 डिसेंबर रोजी सिपना इंजिनिअरिंग कॉलेज बडनेरा रोड, येथे सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांचे नारीशक्ती संमेलन आयोजिण्यात आले आहे.
2025 हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विविध संघटनेतील Nari Shakti Mahila Samelan महिला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण आणि अनेक क्षेत्रात महिलांनी घेतलेल्या उंच भरारीचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. अशी संमेलने संपूर्ण देशात 400 ठिकाणी घेण्यात येत आहे. विदर्भात एकूण 14 ठिकाणी अशी संमेलने होत आहे. त्यामध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नारी संमेलने यशस्वी करीत आहे. संमेलनाच्या उदघाटन सत्रात विश्वमांगल्य सभेच्या सभाचार्या रेणुकामाई यांचे आशीर्वचन होईल. प्रमुख अतिथी म्हणून म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला बद्रे (साळुंखे) तर प्रमुख वक्ता म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालय, बल्लारशाच्या प्राचार्य अरुंधती कावडकर उपस्थित राहणार आहे.
समारोप सत्राच्या प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार (गरकळ) तर राष्ट्र सेविका समितीच्या अ. भा. शारीरिक शिक्षण प्रमुख मनीषा संत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहतील. भारतीय स्त्री दर्शन, राष्ट्र के विकास मे महिलाओ का योगदान या विषयावर त्या मार्गदर्शन करतील. त्यानंतर महिलाओ की स्थानिक समस्या एवं उपाय या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. Nari Shakti Mahila Samelan संमेलनाच्या निमित्ताने विविध विषयांवर आधारित प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शनी आयोजित आहे. संमेलनासाठी ऑनलाईन, ऑफलाइन नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महिलांनी संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजिका संगीता बुरंगे, सहसंयोजिका भावना जोशी, रश्मी गांधी यांनी केले आहे. ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नसेल त्यांनी वेळेवर नारी शक्ती संमेलन स्थळी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.