पश्चिम बंगालमध्ये 24 तासांत 9 नवजात बालकांचा मृत्यू

    दिनांक :08-Dec-2023
Total Views |
कोलकाता,
Newborns die : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीपर्यंत 24 तासांच्या कालावधीत नऊ नवजात आणि एका दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 10 मुलांपैकी तीन मुलांचा जन्म रुग्णालयात झाला असून, सात मुलांना इतर रुग्णालयातून उपचारासाठी आणण्यात आले आहे.
 
Newborns die
 
 
अधिकाऱ्याने सांगितले की, यातील दोन अर्भकांना जन्मापासूनच हृदयविकाराचा त्रास होता, एकाला न्यूरोलॉजिकल समस्या होती, दोघांना सेप्टिसिमियाचा त्रास होता, तिघांचे जन्माचे वजन कमी होते.एक मूल 26 महिन्यांचे होते आणि त्याला Newborns die जन्मजात आजार होते. रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा आठवड्यांपासून जंगीपूर उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे जंगीपूर उपविभागातील सर्व बालकांना बहरामपूरला पाठवण्यात येत आहे. डोमकल, लालबाग उपविभागीय रुग्णालयातील नवजात बालकांना बहारमपूरला मोठ्या प्रमाणात रेफर केले जात असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जेव्हा या रुग्णालयांमध्ये प्रकरणे बिघडतात, तेव्हा नवजात बालकांना मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवले जाते.