मेक्सिको सिटी :
Mexico मेक्सिकोच्या काही भागांत गुरुवारी शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.८ इतकी नोंदविण्यात आल्याचे यूएसजीएसने म्हटले आहे. Mexico अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थानुसार (यूएसजीएस), मेक्सिकोमधील सिटीमधील प्यूब्ला भागात ५.८ तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
त्याचे केंद्र जमिनीत २७ मैल (४४ किमी) खोलीवर होते. या घटनेत Mexico राजधानीतील अनेक इमारतींना हादरे बसले. भीतीमुळे अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नसल्याचे महापौर मार्टी बट्रेस यांनी म्हटले आहे.