गोंदिया,
Praful Patel : अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना भरपाई व धानाला बोनस जाहीर करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज 8 डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्य शासनाला केली. वरील मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना सोपविले.
पूर्व विदर्भातील शेतकर्यांचे अवकाळी पावसामुळे धानपिक, कापणी केलेले धानाचे कडपे, शेतात मळणीसाठी जमा करून ठेवलेले धान पुजन्यांचे व कडधान्य पीकाचे नुकसान झाले आहे. Praful Patel नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, मशागतीचा वाढीव खर्च लक्षात घेता डीबीटीच्या माध्यमातून धान उत्पदकांना सानुग्रह अनुदान (बोनस) हेक्टरी 25 हजार रुपये जाहीर करावे, अशी मागणी आज शुक्रवारी पटेल यांनी नागपूर येथे मख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पावार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगण भूजबळ यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली. यावेळी तिरोडाचे आ. विजय रहांगडाले, गोंदियाचे आ. विनोद अग्रवाल, अर्जुनीचे आ. मनोहर चंद्रिकापुरे, तुमसरचे आ. राजू कारेमोरे, राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे उपस्थित होते.