आरटीओच्या सतर्कतेमुळे 38 गोवंश वाचले

08 Dec 2023 21:07:18
तभा वृत्तसवा
वरूड, 
RTO alertness : वरूड तालुक्यातील पुसलानजीक असणार्‍या आरटीओ नाक्यावर आरटीओ अधिकार्‍याच्या सतर्कतेमुळे नुकतेच 38 गोवंशांना जीवदान मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई करीत एकूण 43 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. परंतु गोवंशाची वाहतूक करणारा कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
 
RTO alertness
 
प्राप्त माहितीनुसार, पांढुर्णा ते अमरावती महामार्गावर गुरूवार, 7 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास पांढुर्णा येथून वरूडकडे जाणार्‍या कंटेनरला RTO alertness आरटीओ अधिकारी प्रमोद सरोदे यांनी थांबवून वाहनात कशाचा माल आहे, असे वाहनचालकाला विचारले असता यामध्ये भुसा घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. परंतु चौकशी दरम्यान वाहनाच्या आतून काहीतरी आवाज आल्याने सरोदे यांचा संशय बळवला. त्यांनी कंटेनर चालकाकडे वाहनाचे दस्तावेज व वाहनातील मालाच्या बिलाबाबत विचारणा केली. तेव्हा चालकाने कंटेनरमधून खाली उतरताच तेथून पळ काढला. सरोदे यांनी या वाहनाची तपासणी केली असता यामध्ये गोंवश कोंबून असलेले आढळून आल्याने त्यांनी या प्रकरणी पुढील कारवाईसाठी शेंदूरजनाघाटचे ठाणेदार सतीश इंगळे यांच्याशी संपर्क केला.
 
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कंटेनर वाहन ताब्यात घेत पंचनामा केला. यातील कोंबून ठेवलेल्या 38 गोवंशाची मुक्तता करीत त्यांना पुढील पालनपोषणासाठी शेंदूरजनाघाट येथील RTO alertness गौरक्षणामध्ये देण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांनी 13 लक्ष 30 हजार रूपयांचे गोवंश व 30 लक्ष रूपायांचा कंटेनर असा एकूण 43 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध पोलिस घेत आहे. ही कारवाई शेंदूरजनाघाटचे ठाणेदार सतीश इंगळे, विष्णू पवार, कुंदन मुधोळकर, सागर लेव्हरकर, वसीम शेख, वीरू अमृतकर यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0