एसटीची रोकड विरहित सेवा सुरू

08 Dec 2023 20:16:42
यवतमाळ, 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST started in Cashless service (एसटी) प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध योजना राबवीत असते. त्यातच अजून एका सुविधेची भर पडली असून महामंडळाने एसटी प्रवाशांना रोकड विरहित सेवा उपलब्ध करून दिली आहे. रा. प. महामंडळाद्वारे नवीन अ‍ॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे.
 
 
St
 
ST started in Cashless service एसटी बसमध्येही रोकड विरहित सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटीद्वारे प्रथम टप्प्यामध्ये यूपीआय क्यूआर कोडद्वारे पैसे घेणे सुरू करण्यात आले आहे. याच्या पुढील टप्प्यात डेबिट व क्रेडिट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात महामंडळाद्वारे सर्व विभागीय कार्यालयांना सूचित करण्यात आले असून क्यूआर कोड वापरासंबंधी वाहकांनाही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0